AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्या…विशेष अधिवेशन नको…काय म्हणतात मनोज जरांगे

manoj jarange patil maratha reservation issue | न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. 24 डिसेंबरनंतर सरकारला वेळ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्या...विशेष अधिवेशन नको...काय म्हणतात मनोज जरांगे
मनोज जरांगे
| Updated on: Dec 19, 2023 | 11:54 AM
Share

संजय सरोदे, जालना, दि.19 डिसेंबर | मराठा आरक्षण राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंतच दिले पाहिजे. या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता यासंदर्भात कोणतेही बाकीचे बहाणे आम्हाला चालणार नाही. आतापर्यंत या विषयावर सरकारने काम चांगले केले आहे. न्या. शिंदे समितीकडूनही चांगले काम झाले आहे. मराठा समाज ओबीसी आरक्षणात आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. यामुळे मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुम्हाला कशासाठी पाहिजे? मागासवर्ग आयोगाला फक्त आदेश द्यायचे असतात. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. तुम्ही हवे तर अधिवेशन पुढे अजून आठ दिवस वाढवा. 24 डिसेंबरपर्यंत असणारे अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत अधिवेशन करा, पण आरक्षणावर निर्णय घ्या, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सांगितले. ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना त्यांनी विविध मुद्यांची मांडणी केली.

आरक्षण घेणारच, आता वेळ मिळणार नाही

24 डिसेंबरच्या पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळ मागण्याची शक्यता नाही. त्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पाठबळ आहे. त्यामुळे शंभर टक्के मराठांना 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळणार आहे. आता सर्व पुरावे असताना विनाकारण बहाने सांगू नये. त्या लोकांचे ऐकूण तुम्हाला मराठ्यांवर अन्याय करायचा आहे का? त्यांचे एकूण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे वाटूळ करणार असाल तर परिणाम वेगळे होतील, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांचे ऐकून जर तुम्ही मराठ्यांवर अन्याय केला तर सहा कोटी मराठ्यांची नाराजगी ओढून घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आंबेडकर यांचे सोल्यूशन…

मराठा आरक्षणाबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तोडगा आहे. त्यांचे हे सोल्यूशन आपण ऐकण्यास तयार आहोत. ऋषिकेश बेंद्रे कधीही नाराज होऊ शकत नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा संवाद यात्रेत 20 ते 23 असा चार दिवस दौरा असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बदनापूर सेलू रेनापुर गंगाखेड आणि बीड असा आहे वीसला गेवराईत आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.