धाड धाड… एकामागून एक 10 भीषण स्फोट, बदलापुरातील MIDC मध्ये खळबळ, अचानक…

Badlapur MIDC Blast : बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवई एमआयडीसीत 8 ते 10 भीषण स्फोट झाले आहेत. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

धाड धाड... एकामागून एक 10 भीषण स्फोट, बदलापुरातील MIDC मध्ये खळबळ, अचानक...
Badlapur Blast
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 07, 2026 | 10:08 PM

बदलापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरवई एमआयडीसीत 8 ते 10 भीषण स्फोट झाले आहेत. खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत हे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीनंतर परिसरात आगीचे लोट पहायला मिळत आहेत. आगीचे हे लोट इतके भीषण आहेत की 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आग पहायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

केमिकल कंपनीत 8 ते 10 भीषण स्फोट

पॅसिफिक केमिकल कंपनीत झालेला हा स्फोट इतका भीषण आहे कीस 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास आठ ते दहा स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे परिसरात आग लागली आहे. यानंतर बदलापूर अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्र मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या हजर

पॅसिफिक केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटांमुळे आग लागली आहे. या आगीने अल्पावधित रौद्र रूप धारण केले. शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाल्याची आणि स्पोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या स्फोटांमुळे परिसरात धुरांचे लोट पसरले आहेत. या आगीमुळे शेजारच्या दोन कंपन्यांनाही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

जीवितहानी झाल्याची माहिती

खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत लागलेल्या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र या स्फोटात कंपनीतील केमिकलचे आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले असलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर नेमकं किती नुकसान झाले याची माहिती समोर येणार आहे.