AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस अधिकारी म्हणाला पत्रकार परिषद घेतली तर चड्डी राहणार नाही, खासदार बजरंग सोनवणेंचं ओपन चॅलेंज म्हणाले…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पोलीस अधिकारी म्हणाला पत्रकार परिषद घेतली तर चड्डी राहणार नाही, खासदार बजरंग सोनवणेंचं ओपन चॅलेंज म्हणाले...
| Updated on: Jan 05, 2025 | 4:39 PM
Share

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहेत. या प्रकरणात सुरुवातीपासूनच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. मी जर पत्रकार परिषद घेतली तर खासदाराची चड्डी राहणार नाही, असं वक्तव्य एका पोलीस अधिकाऱ्यानं केलं होतं, आता या अधिकाऱ्यांना बजरंग सोनवणे यांनी ओपन चॅलेंज केलं आहे. ते पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले बजरंग सोनवणे? 

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी लावली पण त्यातले अधिकारी कोण आहेत? त्यांना खुर्चीवर कोणी बसवलंय? हे पण तपासायला पाहिजे. सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये नेमण्यात आले आहेत. देशपांडे नावाचे सरकारी वकील केस घ्यायला घाबरले कारण यांची दादागिरी गुंडगिरी आणि दडपशाही, काल एक अधिकारी म्हणाला की जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझी चड्डी राहणार नाही,  माझी विनम्र विनंती आहे की तू एकदा प्रेस घेच, तुला विविध ठिकाणी पोस्टिंग मिळण्याबाबत कोणाची मेहरबानी आहे, येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल, असं सोनवणे यांनी म्हटलं आहे.

नऊ तारखेला अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा, जातीचा नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सरकारला जोपर्यंत फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही, तोपर्यंत मोर्चे सुरू राहणार. बीडमध्ये आता जीवन जगणं अवघड झालं आहे. या हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा तो खंडणीखोर आहे. मी राजकारण करायला या मोर्चामध्ये सहभागी झालो नाही. सरेंडर झालेला आरोपी नेमका पकडला की सरेंडर झाला? असा सवालही यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. एवढ्या दिवसांमध्ये कोण कोणाला भेटला? कोणी कोणाची मदत केली, त्या सर्वांना सहआरोपी करा अशी मागणी देखील सोनवणे यांनी केली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.