पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव नाही; थोरातांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले

| Updated on: Feb 14, 2021 | 1:04 PM

बाळासाहेब थोरात आज नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं पूजा चव्हाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधण्यात आलं. (balasaheb thorat reaction on Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांवर दबाव नाही; थोरातांनी फडणवीसांचे आरोप फेटाळले
Follow us on

नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांचा हा आरोप राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फेटाळून लावला आहे. (balasaheb thorat reaction on Pooja Chavan Suicide Case)

बाळासाहेब थोरात आज नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांचं पूजा चव्हाण प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधण्यात आलं. त्यावर थोरात यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले. पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पोलीस दबावात काम करतात अशी पद्धतच नाही. कोणताही पोलीस दबावाखाली काम करत नाही, असं थोरात म्हणाले.

कोरोनाबाबत नवे निर्बंध लागू होणार?

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल थोरात यांनी चिंता व्यक्त केली. नियमात शिथिलता दिल्याने लोक बिनधास्त वागत आहेत. पण लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने काय बंधने घालता येतील याबाबत मुख्यमंत्री एक दोन दिवसात निर्णय घेतील, असं सांगत थोरात यांनी राज्यात पुन्हा नवे निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत.

फडणवीस काय म्हणाले होते?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहीसा झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. (balasaheb thorat reaction on Pooja Chavan Suicide Case)

संजय राठोड नॉटरिचेबल

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात भाजपने थेट नाव घेतल्यापासून वनमंत्री संजय राठोड गेले तीन दिवस फोनवर नॉटरिचेबल आहेत. त्यांचा मंत्रालयासमोर शासकीय बंगला गेली दोन महिने दुरुस्तीमुळे बंद आहे. सध्या ते तात्पुरते चर्चगेट इथल्या छेडा सदन निवासमध्ये राहत आहेत. त्यांच्या छेडा सदन इथल्या घरी ‘टीव्ही 9’ च्या टीमने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते घरी नसल्याचं त्यांच्या घरच्या नोकरानी सांगितलंय. संजय राठोड साहेब कुठे आहेत आम्हाला माहिती नाही, असं नोकरांनी सांगितलंय. (balasaheb thorat reaction on Pooja Chavan Suicide Case)

 

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

Video: अरुण राठोडच नाही तर त्याचं कुटुंबही गायब; त्याच्या गावातून स्पेशल रिपोर्ट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, संजय राऊतांचं रोखठोक मत

(balasaheb thorat reaction on Pooja Chavan Suicide Case)