पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, संजय राऊतांचं रोखठोक मत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. | Sanjay Raut

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, संजय राऊतांचं रोखठोक मत
संजय राऊत

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी कालच स्पष्ट शब्दात सांगितलंय की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. चौकशीतून सत्य समोर येईल. मुख्यमंत्री कुणालाही पाठीशी घालणार नाही, असं रोखठोक मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. (Sanjay Raut On Pooja Chavan Suicide Case And Sanjay Rathod)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशीचे आदेश, मंत्री संजय राठोड यांचे नाव या प्रकरणी चर्चेत, चौकशीतून सत्य बाहेर येईल, राजकारणात एखाद्याचा बळी घ्यायचा, चारित्र्यहनन करायचे, असे प्रकार वाढलेत, राठोड अनेक वर्ष राजकारणात,  राठोड विदर्भात शिवसेनेचा आधारस्तंभ आहेत, असं राऊत म्हणाले.

मुख्यमंत्यांनी चौकशीचे आदेश दिलेत, सत्य समोर येईल

काल संजय राठोड यांच्या विषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत पण राजकारणात एखाद्या व्यक्तीचा बळी घेणं, बदनाम करणं असे प्रकार वाढलेले आहेत. असं केल्याने सरकारला त्रास होईल असं विरोधकाना वाटतं. मात्र असं काहीही होत नाही. विरोधकांनी विरोधकांचं काम करावं. लोकशाहीत ते गरजेचं आहे, असं राऊत म्हणाले.

संजय राठोड शिवसेनेचे मोठे नेते, सेनेचे आधारस्तंभ

संजय राठोड शिवसेनेचे मोठे नेते आहेत. राठोड विदर्भातील सेनेचा आधारस्तंभ आहेत. तसंच त्यांच्या समाजाचे ते सर्वोच्च नेते आहेत.  विरोधी पक्षाने ठरवलं म्हणून त्या दिशेने चौकशी करायची असं होत नाही. पोलिस त्यांचं काम करत आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असं राऊत म्हणाले.

भाजपच्या आरोपांना राऊतांचं उत्तर

महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. विरोधकांनी आरोप केले आणि त्याच दिशेने चौकशी झाली असं होत नाही. शेवटी कुणी काय बोलतो, विरोधक काय बोलतात, त्यावर महाराष्ट्र सरकार चालत नाही. महाराष्ट्र म्हणजे काय उत्तर प्रदेश, बिहार सारखं राज्य नाही. इथे कायद्याचं राज्य आहे, असं राऊत म्हणाले.

छगन भुजबळांची भेट

छगन भुजबळ यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून ही भेट व्हायची राहिली होती. कालपासून नाशिकमध्ये आहे. भुजबळांची मी भेट घेतली. या भेटीत काही मुद्द्यांवर चर्चा झाली. महापालिकेच्या अनुषंगानेही चर्चा झाली. पण काय चर्चा झाली ही आता सांगण्याची वेळ नाही, असं म्हणत झालेला चर्चेचा तपशील राऊतांनी गुलदस्त्यात ठेवणं पसंत केलं.

(Sanjay Raut On Pooja Chavan Suicide Case And Sanjay Rathod)

हे ही वाचा :

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

Video: अरुण राठोडच नाही तर त्याचं कुटुंबही गायब; त्याच्या गावातून स्पेशल रिपोर्ट

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI