मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी या संबंधातील नीट माहिती घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते त्यांना कळेल, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दिला. Pooja Chavan suicide case

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला


नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide case ) आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का?असा प्रश्न निर्माण होतोय, असं म्हटलं. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी या संबंधातील नीट माहिती घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते त्यांना कळेल, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला. (Devendra Fadnavis said CM Uddhav Thackeray should listen audio clips carefully in Pooja Chavan suicide case)

देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांची कारवाई दबावात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय. पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांना खुलं मैदान आहे. पोलिसांवरील दबाव नाहिसा झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घ्यावी मग…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे. जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्सहर्बर प्रकल्पाच्या कामाच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी त्यांना पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राठोड यांच्यावर कारवाई करणार का? “या संदर्भात व्यवस्थित चौकशी केली जाईल… जे सत्य आहे ते बाहेर येईलच…यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज आहे त्यांच्यावर कारवाई होईल. या संदर्भात सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही दिवस काही महिने… एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय…असाही प्रयत्न होता कमा नये… आणि सत्यही लपवण्याचा प्रयत्न होता कामा नये… या मध्ये जे सत्य असेल ते संपूर्ण चौकशी करून जनते समोर येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पूजा चव्हाणची आत्महत्या मंत्र्यामुळे?

पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली आहे. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली आहे. पूजा चव्हाणनं विदर्भातल्या एका मंत्र्यासोबतच्या प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा होती. त्याची चौकशी करा म्हणून भाजपच्या पुण्यातल्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षांनी आयुक्तांना निवेदनही दिलं आहे. पण या प्रकरणातील मंत्र्याचं नाव आतापर्यंत कुठेही समोर आलेलं नव्हतं. ना ते तक्रारीत आहे ना, कुठे एफआयआरमध्ये. पण आता भाजपकडून त्या मंत्र्याचं नाव समोर आणलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

संबंधित बातम्या:

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

बीडच्या 22 वर्षीय तरुणीची पुण्यात आत्महत्या, तर्कवितर्कांना उधाण

(Devendra Fadnavis said CM Uddhav Thackeray should listen audio clips carefully in Pooja Chavan suicide case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI