Video: अरुण राठोडच नाही तर त्याचं कुटुंबही गायब; त्याच्या गावातून स्पेशल रिपोर्ट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या एक नव्हे 11 ऑडिओ क्लिप व्हायर झाल्या. (where is arun rathod?, read special report from beed)

Video: अरुण राठोडच नाही तर त्याचं कुटुंबही गायब; त्याच्या गावातून स्पेशल रिपोर्ट
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 1:09 PM

बीड: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या एक नव्हे 11 ऑडिओ क्लिप व्हायर झाल्या. या ऑडिओ क्लिपमधील व्यक्ती वन मंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता अरुण राठोड असल्याचं पुढे आलं. या प्रकरणात अरुण राठोड याचं नाव आल्यानंतर त्याला अटक करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. मात्र, या घटनेनंतर अरुण राठोड हा गायब झाला असून तोच नव्हे तर त्याचं अख्खं कुटुंबही गावातून गायब झालं आहे. आमच्या प्रतिनिधीने अरुणच्या धारावती तांडा गावातून घेतलेला हा स्पेशल आढावा… (where is arun rathod?, read special report from beed)

कुठे आहे अरुणचं गाव?

अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण प्रकरणात त्याचं नाव आल्यानंतर टीव्ही 9 मराठीच्या टीमने थेट त्याचं गावच गाठलं. त्याच्या गावात जाऊन आधी त्याच्या घराला भेट देऊन त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या घराला कुलूप होती. अरुण घरी नव्हता आणि त्याचं कुटुंबही गावात नव्हतं. गावातील लोकांनाही त्याचं कुटुंब कुठं गेलं याची माहिती नाही. कोणीही काही सांगायला तयार नाही. त्यामुळे राठोड कुटुंब गेलं कुठं? असा सवाल केला जात आहे.

मातीची घरं, कच्ची सडक

आमची टीम धारावती तांड्याला पोहोचली. हे गाव अत्यंत छोटंसं दिसलं. पण गावात वर्दळ मोठी होती. आम्ही संत सेवालाल चौकात पोहोचलो. इथं गौर सेनेचा बोर्ड लावलेला होता. गावचे रस्ते कच्चे होते. एकही सिमेंटचा रस्ता दिसला नाही. चौकाच्या बाजूला किराणाचं दुकान होतं. दुकानाभोवती उघडी नागडी लहान पोरं खेळत होती. आम्ही थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तर गावात काही गाड्या दिसल्या. रस्त्याच्या दुतर्फा मातीची घरं दिसली. गावात माणसांची वर्दळ दिसत होती. शेळ्या मेंढ्यांचे आवाज आणि कूत्र्यांची ये जाही सुरू होती. गावात काहीच घडलं नाही, अशीच परिस्थिती जाणवत होती.

बालाजी कृपा, राठोड निवास 2010

आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला अरुणचं टुमदार घर दिसलं. अरुणचं घर पक्कं आणि स्लॅबचं आहे. घरावर बालाजी कृपा असं लिहिलेलं आहे. बाजूलाच ओम असंही लिहिलेलं असून भिंतीवर हिरव्या रंगाचं नक्षीकाम करण्यात आलं आहे. घराला पिवळसर रंग दिलेला आहे. घराच्यावर मधोमध राठोड निवास 2010 लिहिलेलं आहे. घरासमोर मोठं अंगण असून अंगणात मधोमध झाड लावलं आहे. घराच्या चोहोबाजूला सिमेंटच्या भिंतींचं कुंपन असून मोठा लोखंडी गेटही लावलेला आहे. गेटच्या बाहेरही एक मोठं झाड आहे. घराला कुलूप लावलेलं होतं. गेटलाही मोठं कुलूप लावलेलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून घरात कोणीही नसल्याचं गावकरी सांगतात. साधारणपणे बघातच क्षणी अरुणचं कुटुंब सधन असल्याचं दिसून येतं.

अरुण मूळचा धारावती तांड्याचा नाही

अरुण हा मूळचा दारावती तांड्याचा नाही. काही वर्षापूर्वी राठोड कुटुंब येथे येऊन थांबले. ते मूळचे कोठडा येथील आहे. अरुण पदवीधर आहे. गावातील शिकलेल्या तरुणांपैकी तो एक आहे. तो मितभाषी असल्याचंही गावकरी सांगतात.

क्लिपमधील आवाजाबाबत शंका

आम्ही अरुणच्या घराची पाहणी केल्यानंतर अरुण आणि त्याच्या कुटुंबीयांबाबतची माहिती गावकऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एका गावकऱ्याने तर क्लिपमधील संजय राठोड आणि अरुण राठोड यांच्या आवाजाबाबत शंका उपस्थित केली. हा आमच्या नेत्याचा आवाजच नाही असं या गावकऱ्याचं म्हणणं आहे. तर आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून समजााला बदनाम करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या गावकऱ्याने दिला.

संजय राठोडांचा कार्यकर्ता नव्हता

अरुण हा संजय भाऊ राठोड यांचा कार्यकर्ता नव्हता, असं दुसऱ्या ग्रामस्थाने सांगितलं. अरुण पदवीधर आहे. त्याचा संजयभाऊशी क्वचितच संबंध आला असेल. शिकलेला असल्याने नोकरीच्या निमित्ताने संबंध आले असेल. नाही तर तो कुणाच्या भानगडीत पडणारा नाही. आपलं घर आणि शिक्षण हेच अरुणचं जग होतं, असं या गावकऱ्याने सांगितलं.

शिक्षणामुळे पूजाच्या संपर्कात

तिसऱ्या ग्रामस्थाने पूजा आणि अरुणच्या संपर्कावर प्रकाश टाकला. पूजा आणि अरुणचा संपर्क शिक्षणामुळे आला असेल. पूजा वसंत नगरमध्ये राहते. दारावती तांड्यापासून वसंत नगर सात-आठ किलोमीटरवर आहे. परळीत कॉलेज असल्याने शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली असेल, असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. चौथ्या ग्रामस्थाने अरुणचे आई-वडील शेतकरी आहेत. शेती करतात आणि ऊसतोडीचं काम करतात. ते गरीब आणि मजूर आहेत, असं सांगितलं.

महिला म्हणतात, सखोल चौकशी करा

गावातील महिलांनीही या प्रकरणावर त्यांचं मत मांडलं. पूजा आमच्या समाजाची आहे. तिच्यावर अन्याय होऊ नये. ऑडिओ क्लिपची कसून चौकशी करा. समजाला बदनाम करू नका. आमचा कायद्यावर विश्वास आहे. पुरावा असेल तरच बोला. पुराव्याशिवाय कुणीही समाजाची बदनामी करू नये, असं या महिलांचं म्हणणं आहे. संजय राठोड हे आमच्या समाजाचे नेते आहेत. आमच्याकडे तेवढाच नेता आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आमची कळकळ आहे, असंही या महिलांनी सांगितलं.

भातखळकरांना इशारा

एका ग्रामस्थाने तर भाजप नेते अतुल भातखळकर यांना फोन करून त्यांना समाजाची बदनामी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्याचं सांगितलं. भातखळकरांनी राठोडगिरी शब्द वापरून समाजाची बदनामी केली. त्याबाबत त्यांच्याशी फोन करून त्यांना जाब विचारला. त्यांनी पुन्हा असे शब्द वापरल्यास संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यावर भातखळकर यांनी हा शब्द वापरणार नसल्याचं सांगितल्याचंही या ग्रामस्थाने सांगितलं.  (where is arun rathod?, read special report from beed)

संबंधित बातम्या:

भाऊ, पूजा ताई र आत्महत्या छ कि घात पात हाई?; फेसबुकवर राठोडांना नेटकऱ्यांचा सवाल

कोण आहे अरुण राठोड? जो सातत्यानं पूजा आणि मंत्र्यांच्या संपर्कात होता?

मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय: देवेंद्र फडणवीस

(where is arun rathod?, read special report from beed)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.