
बल्लारपूर विधानसभा मतदार संघ हा चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या सहा मतदार संघापैकी एक मतदार संघ आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात यंदा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महायुती सरकारमधील वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवित आहेत. त्यांची मुख्य लढत कॉंग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्याशी होणार आहे. कॉंग्रेसमध्ये डॉ.अभिलाषा गावतुरे आणि प्रकाश पाटील मारकवार अशी दुहेरी बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मतविभाजनाचा मोठा धोका आहे. या मतविभाजनाचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना होतो का ? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. पराभवाचा वचपा काढणार का ? साल 2009 पासून सलग तीन वेळा भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झालेला आहे. आता ते चौथ्यांदा निवडणूकीला उभे आहेत. लोकसभा निवडणूकीला चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून त्यांचा पराभव झाला होता. लोकसभेला स्वत:च्या बल्लारपूर मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार हे 48 हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत ही पिछाडी...