
काही दिवसांपूर्वी पुण्यात आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली होती, आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करण्यात आला, या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही घटना घडल्यानं पुणे चांगलंच हादरलं. आयुष कोमकर हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. आयुष याची हत्या त्याचेच आजोबा आणि वनराज आंदेकर यांचे वडील बंडू आंदेकर यांनी केल्याचा आरोप आहे. आयुष याची हत्या टोळीयुद्धातूनच झाल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र दुसरीकडे बंडू आंदेकर याने त्याला न्यायालयात हजर केले असता आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. वनराज अंदेकर नगरसेवक होता. तो युथ आईकोन होता, त्यामुळे आयुषची हत्या झाली असावी, मी माझ्या नातवाची हत्या का करू? आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे. जेव्हा आयुषची हत्या झाली तेव्हा मी केरळला होतो असं बंडू आंदेकर याने कोर्टात सांगितलं आहे. आयुष याला पार्किमध्ये गाठून, त्याच्यावर दोघांनी गोळीबार केला होता.
दरम्यान आता या प्रकरणावर आयुष कोमकर याची आई आणि भावाची प्रतिक्रिया समोर आली आहे, या प्रकरणात त्यांनी मोठा दावा केला आहे. माझ्याच लोकांनी का असं केलं हे काही कळत नाही, आयुषच्या थेट घशातच त्यांनी गोळी मारली, आम्ही लहानपणापासून पाहातोय, असाच त्यांचा प्लॅन असायचा, असं काही कांड करण्याच्या आधी आंदेकर हे बाहेर जातात असा मोठा दावा आयुषच्या आईने केला आहे. तसेच या सर्व प्रकरणात पोलीस देखील सहभागी आहेत, असा गंभीर आरोप देखील त्याच्या आईकडून करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेबाबत बोलताना अमन पठाण आणि एस पाटील यांनी माझ्यासमोर गोळ्या झाडल्या, गोळ्या मारल्यानंतर इथ फक्त बंडू अंदेकर आणि कृष्णा अंदेकर चालणार असं आरोपी बोलले अशी प्रतिक्रिया आयुषच्या भावानं दिली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.