
माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर आता धक्कादायक खुलासा झालाय. गोविंद बर्गे यांच्यावर कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिचा दबाव होता. गोविंद यांना कला केंद्रात जायचा नाद लागला. तिथे जाऊन ते मोठा पैसा उधळत. यादरम्यानच नर्तकी पूजा आणि त्यांच्याच ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पूजा सतत पैसा, जमीन आणि घराची मागणी गोविंदकडे करत. पूजाचे सासुरेगावचे घर अगोदर पत्राचे होते. गोविंदने पूजाच्या प्रेमासाठी ते घर बांधून दिले. हेच नाही तर काही नातेवाईकांच्या नावावर पूजाने गोविंदला प्लॉट करण्यासाठी दबाव टाकला.
गोविंदने त्याच्या गेवराईतील बंगल्यावर पूजाला दोन दिवस नेले होते. तिथे पूजा तब्बल दोन दिवस राहिली. पूजाला गोविंदचा हा आलिशान बंगला इतका जास्त आवडला की, तिने म्हटले की, तुझा हा बंगला मला लई आवडलाय..हा बंगला माझ्या नावावर कर..गोविंदने सुरूवातीला पूजाच्या या मागणीकडून दुर्लक्ष केले. त्यानंतर गेवराईचा बंगला आपल्या नावावर करून घेण्यासाठी ती गोविंदवर दबाव आणत होती.
गोविंदने स्पष्टपणे नर्तकी पूजाला सांगितले की, हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही. कारण याबद्दल माझ्या वडिलांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. गावाकडील लोक मला काय म्हणतील…माझी अब्रू जाईल…मी तुला याच बंगल्यासारखा दुसरा बंगला देतो…पण हा अजिबातच नाही. गोविंदने गेवराईतील हा बंगला देण्यास स्पष्ट नकार दिला असताना देखील पूजाने तगादा सोडला नाही.
गोविंद गेवराईतील बंगला आपल्या नावावर करत नसल्याने पूजाचा संताप झाला. कारण आतापर्यंत पूजाने मागितलेली प्रत्येक गोष्ट गोविंदने तिला पुरवली. मात्र, बंगल्या तिच्या नावावर करण्यास नकार दिला. यामुळे पूजाने थेट गोविंदसोबत बोलणे बंद केले. हेच नाही तर पूजाने गोविंदचे फोन घेणेही बंद केले. शेवटी तो पूजाच्या आईला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला. ज्यावेळी गोविंद हा पूजाच्या घरी गेला होता, त्यावेळी ती कला केंद्रात होती. मात्र, नर्तकीच्या आईनेही प्रतिसाद दिला नसल्याने शेवटी गोविंदने स्वत: गोळी झाडली.