AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण, वकिलाच्या दाव्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय!

बीड जिल्ह्यातील खोक्या भोसले याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल आहे.

खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण, वकिलाच्या दाव्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय!
satish bhosale
| Edited By: | Updated on: Apr 03, 2025 | 10:16 PM
Share

Satish Bhosale : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा अनेक कारणामुळे चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणं समोर आली आहेत. याच काळात सतीश भोसले उर्फ खोक्याचेही कारणामे समोर आले. त्यानंतर आता हा खोक्या तरुंगात आहे. पोलिसांच्या ताब्यात आहे. असे असतानाच आता या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचे म्हटले जात आहे. या मारहाणीचे फोटो व्हायरल जाल्यानंतर आता खोक्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय. खोक्याच्या वकिलाने तसा दावा केला आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर वळ उठल्याचे कथित फोटो व्हायरल झाले आहेत. या मारहाणीच्या दाव्यानंतर आता खोक्या भोसलेले पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खोक्या भोसले याला न्यायालयीन कोठडी

सकाळपासून खोक्या उर्फ सतीश भोसले याला वन विभागाने ताब्यात गेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण झाल्याचे त्याच्या वकिलाने म्हटले आहे. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलाने सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.

खोक्यावर नेमके आरोप काय आहेत?

गेल्या काही दिवसांपूर्वी खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला होता. त्याचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्याशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. खोक्यावर एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण करणे हा आहे. तर दुसरा गुन्हा हा हरणांची शिकार केल्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देऊन पळत होता. त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

Follow Us
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?