AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमधील गुन्हेगारीचं सत्र संपता संपेना, आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या एका अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सतीश भोसले नावाच्या कुख्यात गुंडाने एका गरीब व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे दिसते आणि जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

बीडमधील गुन्हेगारीचं सत्र संपता संपेना, आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर
beed
| Updated on: Mar 05, 2025 | 8:54 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. बीडमध्ये चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच आहेत. यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता बीडला बिहार असे संबोधले जात आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यात पुन्हा एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मारहाणीचा असल्याचे सांगितले जात आहे. यात कुख्यात गुंड सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा पाहायला मिळत आहे. सतीश भोसलेने बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले आहे.

सगळेच दात तुटले

या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीला मारहाण करणाऱ्याचे नाव सतीश भोसले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबतच संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बॅटने मारहाण

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?