Beed Lockdown Update | बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा, लॉकडाऊनमध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता

| Updated on: Mar 29, 2021 | 7:35 PM

बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता देण्यात येणार आहे. Beed Lockdown Update

Beed Lockdown Update | बीड जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा, लॉकडाऊनमध्ये सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Follow us on

बीड: जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून कोरोना विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात 26 एप्रिल ते  4 मार्चपर्यंत 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. (Beed lockdown update guardian minister Dhanajay Munde announced relief for Beed people from lockdown)

धनंजय मुंडे यांचं ट्विट

बीडमध्ये 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. 26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत बीडमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. याआधी बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला होता. 13 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

कोरोना चाचणी बंधनकारक

बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे शहरातील व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोनाची चाचणी टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बीडमधील ‘त्या’ जावयांचा सुटकेचा निश्वास

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथील जावयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या परंपरेला जवळपास 80 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे.

संबंधित बातम्या:

बीडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सरशी, जिल्ह्यात मनसेनेही खातं उघडलं, भाजपला मोठा झटका

Pandharpur Assembly By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर

(Beed lockdown update guardian minister Dhanajay Munde announced relief for Beed people from lockdown)