AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कुणी मारली बाजी?

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला असून, त्यांनी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला आहे.

बीडच्या मस्साजोग पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, कुणी मारली बाजी?
massajog
| Updated on: Apr 29, 2026 | 11:11 AM
Share

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील अत्यंत चर्चेत असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा पराभव झाला आहे. तर स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांच्या फरकाने बाजी मारत दणदणीत विजय मिळवला आहे.

हत्येच्या सावटाखाली निवडणूक

मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या धक्कादायक घटनेमुळे हे सरपंचपद रिक्त झाले होते. संतोष अण्णांच्या निधनामुळे गावात निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचा विचार करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या एका गटाकडून आणि देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली होती. यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांना बिनविरोध संधी देऊन संतोष अण्णांना खरी श्रद्धांजली द्यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत होती.

मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत अर्ज मागे घेण्यास नकार दिला. अखेर आज जाहीर झालेल्या निकालात स्वरूपानंद देशमुख यांनी बाजी मारली. या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  त्यांनी आपली ताकद वाढवत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरीकडे, संतोष देशमुख यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने अश्विनी देशमुख यांना मोठी सहानुभूती मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र मतदारांनी विकासाला किंवा अन्य मुद्द्यांना प्राधान्य दिल्याने ही सहानुभूती फॅक्टर चालला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा मतदानाच्या टक्केवारीत १० टक्क्यांनी वाढ 

या निवडणुकीसाठी ७ एप्रिल २०२६ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील एकूण ८८ रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा हा भाग होता. २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मस्साजोगमध्ये एकूण २,२८४ मतदार आहेत. यंदा गावात विक्रमी मतदान पाहायला मिळाले. यंदाच्या या निवडणुकीत तब्बल ८४ टक्के मतदान झाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत १० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता, मात्र दुपारनंतर मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली.

मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात किरकोळ गोंधळ वगळता संपूर्ण मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्वरूपानंद देशमुख यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच