AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखांच्या पत्नीने सीआयडीकडे नोंदवला जबाब, धक्कादायक माहिती समोर

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

संतोष देशमुखांच्या पत्नीने सीआयडीकडे नोंदवला जबाब, धक्कादायक माहिती समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं
| Updated on: Jan 13, 2025 | 4:44 PM
Share

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या विविध चौकशी समितींकडून चौकशी केली जात आहे. त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला सध्या वेग आला आहे. आता नुकतंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख अस्वस्थ झाले होते. अश्विनी देशमुख यांनी सीआयडीकडे याबद्दल जबाब नोंदवला आहे. यात अश्विनी यांनी, संतोष देशमुख यांना हत्येच्या एक महिना आधी धमकी मिळाली होती, अशी माहिती दिली आहे.

संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी

संतोष देशमुख यांना हत्येच्या एक महिना आधी धमकी मिळाली होती. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे संतोष देशमुख हे अस्वस्थ झाले होते. साधारण नोव्हेंबर महिन्यात संतोष देशमुख यांना धमकी मिळाली होती. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाली होती, असा खुलासा अश्विनी देशमुख यांनी केला आहे.

मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक

दरम्यान बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र वाल्मिक कराडला खंडणीप्रकरणी अटक झाल्याने त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही. आता यावरुन मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.  तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

Follow Us
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...