AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास, किती टक्के मिळाले?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यातील वैभवी देशमुखने वडिलांच्या निधनानंतरही उत्कृष्ट यश मिळवले आहे. तिला ८५.११% गुण मिळाले आहेत.

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास, किती टक्के मिळाले?
santosh deshmuh vaibhavi deshmukhImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 05, 2025 | 2:17 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. या परीक्षेत बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने मोठे यश मिळवले आहे. वैभवीला बारावीच्या परीक्षेत ८५.११ टक्के गुणे मिळाले आहेत. वैभवीने निकालापूर्वी भावूक प्रतिक्रिया दिली होती. आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे, असे वैभवी देशमुखने म्हटले होते.

वैभवी देशमुखची बारावीची गुणपत्रिका समोर आली आहे. यात वैभवीला ६०० पैकी एकूण ५१२ गुण मिळवले आहेत. तिला इंग्रजी विषयात ६३, मराठीत ८३, गणितात ९४, फिजिक्समध्ये ८३, केमिस्ट्रीमध्ये ९१ आणि बायोलॉजीमध्ये सर्वाधिक ९८ गुण मिळाले आहेत. विशेष बाब म्हणजे, वैभवी देशमुखने तिच्या वडिलांच्या हत्येनंतर अवघ्या दोन महिन्यांनी तिने दुःखाचा डोंगर असतानाही बारावीची परीक्षा दिली होती. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आपण परीक्षा देत असल्याचे तिने त्यावेळी सांगितले होते.

वैभवी देशमुख निकालापूर्वी काय म्हणाली?

आज बारावीच्या निकालापूर्वी वैभवी म्हणाली, “आज सकाळी मी वडिलांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगला येईल, असा मला विश्वास आहे. पण आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत, याचे मला दुःख आहे,” अशी भावना तिने व्यक्त केली होती.

बारावी परीक्षेचा निकाल 91.88 टक्के

दरम्यान यंदाच्या बारावी परीक्षेसाठी राज्यभरातून १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला. विभागानुसार निकालाची आकडेवारी पाहिल्यास, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के लागला आहे. तर, लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. यावर्षीही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल ९४.५८ टक्के, तर मुलांचा निकाल ८९.५१ टक्के इतका आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.