AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉम अँड जेरी पाहत नाही… सुरेश धस कुणाला उद्देशून म्हणाले?; त्या वकिलाची…

आज आमचा आक्रोश मोर्चा आहे. त्यासाठी आम्ही मुंबईत आलो आहोत. आमची व्यथा मांडणार आहोत. पण आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. त्यांची आधीच भेट घेतली होती. मुख्यमंत्री रात्री उशिरा दावोसवरून आले. त्यामुळे तिकडे जाण्याचा संबंध नाही, असं सांगतानाच वाल्मिक कराडची संपत्ती जप्त केली पाहिजे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.

टॉम अँड जेरी पाहत नाही... सुरेश धस कुणाला उद्देशून म्हणाले?; त्या वकिलाची...
| Updated on: Jan 25, 2025 | 1:29 PM
Share

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून संपूर्ण मराठवाड्यात हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. आता मोर्चाचं हे वादळ मुंबईत धडकलं आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही या मोर्चात सहभागी झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा मोर्चात सामील होण्यासाठी मुंबईत आले आहेत. यावेळी सुरेश धस यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली. तसेच एका प्रसिद्ध वकिलाचा उल्लेख टॉम अँड जेरी असा केला.

भाजपचे आमदार सुरेश धस हे आता मीच मराठ्यांचा मोठा नेता आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलं आहे, असा चिमटा सुरेश धस यांनी काढला आहे. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.

हा मोर्चा नाही, पब्लिक क्राय

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. त्यात सुरेश धस समील होत आहे. त्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी गावाकडून आलोय. मला यायला साडे सहा सात तास लागले. शेकडो लोक या मोर्चात सामील झाले आहे. हा फक्त मोर्चा नाही. हा पब्लिक क्राय आहे. केवळ आरोपींना अटक केली म्हणजे झालं असं होत नाही. तर या लोकांना फाशी द्यावी ही मागणी आहे. इतका भयंकर मर्डर कधी झाला नाही. हा आक्रोश आहे. लोक राग व्यक्त करण्यासाठी आले आहेत. संतोष देशमुख कुटुंबाला बोलावल्यावर ते येतात. ही राजधानी आहे. मी या प्रश्नाची सुरुवात केली. मीही मुंबईकरांसोबत आहे. आज आम्ही मुंबईकर आहोत. आम्ही बोलणार आणि आमच्या व्यथा मांडणारच, असं सुरेश धस म्हणाले.

फाशी शिवाय दुसरा मार्गच नाही

फाशी शिवाय दुसरा मार्गच नाही. हे लोक फाशीच गेले पाहिजे. यातील कोणही सुटता कामा नये. त्यांना लवकरात लवकर शिक्षा सुनावली गेली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवली गेली पाहिजे. या लोकांना फाशी दिली तर असा गुन्हा करायला कोणी धजावणार नाही. गुन्हेगारांमध्ये दहशत राहील, असंही त्यांनी सांगितलं.

बहुतेक मर्डर राजकीय

अनेक हत्यांवर मी भाष्य करत आहे. महादेव मुंडेंची हत्या झाली, त्यावर मी बोललो. संदीप दिघोळेचं काढतोय. तिकडे फड गेला आहे. अनेक लोकांच्या मर्डर झाल्या आहेत. त्यांचा उल्लेख करणं पाप आहे का? बहुतेक मर्डर राजकीय आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व प्रकरणं बाहेर काढणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद 
सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार
Gold-Silver : सोने-चांदीच्या आयातीवर तब्बल एवढे टक्के कर लागू होणार; सरकारच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय?