AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लान असावा – बजरंग सोनावणेंचा खळबळजनक आरोप

अजित पवार यांना अडकवण्याचा ( वाल्मिकी) कराडचा प्लान असावा असा आरोप सोनावणे यांनी केला आहे. ताफ्यात गाडी टाकून अजित दादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा, असा आरोप सोनावणे यांनी केला.

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लान असावा - बजरंग सोनावणेंचा खळबळजनक आरोप
बजरंग सोनावणे
| Updated on: Jan 03, 2025 | 1:41 PM
Share

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 20 पेक्षा जास्त दिवस उलटून गेले असून अद्यापह काही आरोपी फरार आहेत. सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत, पोलिसांकडून कसून शोध घेतला जात असूनही देशमुख यांचे मारेकरी आणि त्यामागचा मास्टरमाईंड कोण हे अद्यापही सापडलेलं नाही. हे प्रकरण आता बीडपुरतं मर्यादित उरलं नसून संपूर्ण राज्यभरात त्याची चर्चा आहे, वातावरणही तापू लागलं आहे. या मुद्यावरून विरोधक रोजच्या रोज नवनवे दावे, आरोप करत सरकारला धारेवर धरत आहे. अजित पवार हे मस्साजोग येथे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी नुकताच केला होता.

आता त्यांनी याप्रकरणी आता आणखी एक नवा दावा केला आहे. अजित पवार यांना अडकवण्याचा ( वाल्मिकी) कराडचा प्लान असावा असा आरोप सोनावणे यांनी केला आहे. ताफ्यात गाडी टाकून अजित दादांना अडकवण्याचा त्यांचा कट असावा, असा आरोप सोनावणे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

काय म्हणाले बजरंग सोनावणे ?

माझा अजित पवारांवर कोणताही आरोप नाही, असे सोनावणे यांनी आधीच स्पष्ट केले. संतोष देशमुख यांचे जेवढे मारकेरी आहेत ते पकडले गेले पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे आणि यामागचा जो मास्टरमाईंड आहे त्यालाही फाशी झाली पाहिजे, हाच माझा फोकस आहे. अजूनही या प्रकरणातील 3 आरोपी फरार आहेत, त्यांना पकडून शिक्षा व्हावी एवढीच माझी मागणी आहे,असे ते म्हणाले.

अजित दादा 21 तारखेला आले होते, हा आरोपी ( कराड) ज्या गाडीने सरेंडर होण्यासाठी आला, त्याच गाडीचा मालक तिथे होता. ज्याच्या नावावर गाडी आहे, तो तिथे होता. माझ्याकडे फोटो आहेत, मी विनाकारण आरोप करत नाही. अजित दादांवर माझा कोणताही आरोप नाहीये. अजित पवारांना काही बोलण्याचा, त्यांना टार्गेट करण्याचा माझा हेतू नाहीये, त्यांच्याविषयी बोलण्याचं मला काहीच कारण नाही. मी ( या मुद्याचं) राजकारण करत नाहीये. पण देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपीला जे सहकार्य करत आहेत, त्यांच्यावर माझा आरोप आहे. देशमुखांचे जे मारेकरी आहेत, जे या कटात आहे, त्यांना पकडा आणि फाशी द्या एवढंच माझं म्हणणं आहे, असा पुनरुच्चार सोनावणे यांनी केला.

मला प्रसिद्धी नको, मला हाव नाही

काल बदरंग सोनावणेंनी आरोप केल्यानंतर बरीच खळबळ माजली होती. त्यांना प्रसिद्धी हवी यासाठी ते असे आरोप करत आहेत, असे म्हणत सरकारमधील नेत्यांनी त्यांच्यावरच टीका केली होती. मात्र बजरंग सोनावणे यांनी हे सर्व दावेही फेटाळून लावले. कोणी म्हणतं की मला प्रसिद्धी हवी म्हणून मी हे सगळं करतोय, पण स्पष्ट सांगतो, मला प्रसिद्धी नकोय. बीड जिल्ह्याच्या जनतेने मला खासदार करून मला खूप प्रसिग्ध केलंय, त्यामुळे मला आणखी प्रसिद्धी नकोय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे, माझा हेतू आहे, असे सोनावणे यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक