
घरात नवजात बाळ येणे हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण असतो. कुटुंबीय ९ महिने या क्षणाची वाट पाहात असतात. पण या नवजात बाळाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. अनेकदा नकळत होणाऱ्या चुकांमुळे बाळाला त्रास होऊ शकतो. असाच काहीसा प्रकार बीडमध्ये घडला आहे. एका 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
नेमकं काय घडलं?
गुन्हेगारी विश्वात बीड जिल्हाचे नाव सर्वात पुढे असल्याचे म्हटले जाते. आता येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बीड तालुक्यातीव काटवटवाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 7 महिन्यांच्या मुलीच्या घश्यात चॉकलेट अडकल्यामुळे कुटुंबीय घाबरले होते. तिला तसेच उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वाचा: पितृपक्षात 12 वर्षांनंतर गजकेसरी राजयोग, या 3 राशींचे चमकणार नशीब, होईल धनवर्षाव!
या घटनेनंतर काटवटवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 महिन्यांच्या चिमुकलीचे नाव आरोही आनंद खोड असे होते. घरात खेळत असताना चिमुकलीने जमीनीवर पडलेले चॉकलेट उचलले. ते चॉकलेट तिने तोंडात टाकले आणि गिळले. मात्र, चिमुकली 7 महिन्यांची असल्यामुळे तिच्या घशात ते चॉकलेट अडकले आणि तिचा दुर्वैदी मृत्यू झाला.
फुफ्फुसात एलईडी बल्बचा तुकडा
आधी मुंबईत असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता. पण डॉक्टरांच्या कृपेना साडेतीन वर्षांच्या मुलाचा जीव वाचला होता. या मुलाने एलईडी बल्बचा धातूचा तुकडा खाल्ला होता. त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. सुरुवातीला न्यूमोनिया आजाराने तो ग्रस्त होता. सतत काळजी घेऊन, औषध उपचार घेऊनची तो बरा होत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्या आणि सीटी स्कॅन केले. त्यामध्ये त्याच्या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा तुकडा असल्याचे दिसले. त्यानंतर जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला तुकडा यशस्वीरित्या काढून टाकला.