AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साफसफाई करताना JCBचा भिंतीला धक्का, भिंत कोसळून 7 वर्षांची चिमुरडी गुदमरली! जागीच मृत्यू

चिंचोळ्या गल्लीतून जेसीबी आत नेताना अडचणी येत होत्या. तरिही जबरदरस्ती जेसीबी आतमध्ये घालण्यात आलेला

साफसफाई करताना JCBचा भिंतीला धक्का, भिंत कोसळून 7 वर्षांची चिमुरडी गुदमरली! जागीच मृत्यू
बीडमधील दुर्दैवी घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Apr 29, 2022 | 9:38 AM
Share

बीड : बीडमध्ये (Majalgaon, Beed) एका सात वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेसीबीच्या (JCB) साहायानं साफसफाई केली जात होती. दरम्यान, धक्का लागून भिंक कोसळली आणि त्याखाली ही चिमुरडी भिंतीखाली दबून गेल्यानं तिचा जीव गेलाय. यानंतर परिसरातील स्थानिक संतप्त झाले होते. जेसीबी चालकाला यानंतर स्थानिकांनी चोप दिली आणि पोलिसांच्या हवालेदेखील केलंय. रमजान ईद (Ramdan Eid) निमित्तानं यावेळी साफसफाई केली जात होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेल्या या सात वर्षीय चिमुकलीचं नाव सय्यद इकरा असं आहे. भिंती खाली दबून गुदमरल्यामुळे सय्यद हीचा जागीच जीव गेला. या जेसीबीचा चालक नवीन होता अशीही माहिती समोर आली आहे. ही घटना झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी जेसीबी चालकासह जेसीबीचीही तोडफोड केली.

कुठे घडली घटना?

ही दु्र्दैवी घटना माजलगावमध्ये घडली. माजलगावचज्या इदगा मोहल्लामध्ये एक मोठी मशीद आहे. तिथं साफसफाईचं काम हाती घेण्यात आलं होतं. रमजान ईद असल्यानं नगरपालिकेकडून मशिदीच्या परिसराची स्वच्छता करण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. त्यासाठी जेसीबीदेखील मागवण्यात आला होता.

..आणि चिमुरडी भिंतीखाली सापडली

मात्र या भागातील चिंचोळ्या गल्लीतून जेसीबी आत नेताना अडचणी येत होत्या. तरिही जबरदरस्ती जेसीबी आतमध्ये घालण्यात आलेला. हा जेसीबी मशिदीसमोरील भिंतीजवळ आला असता, भिंतीला धक्का लागला आणि भिंत कोसळली. त्याचवेळी नेमकी सात वर्षांची सय्यद ही तिथून जात होती. तेव्हा तिच्या अंगावर ही भिंत कोसळली आणि ती भिंतीखाली दबल्यानं गुदमरली.

चार जणांवर गुन्हा

या घटनेनंतर जेसीबीच्या मदतीनंच तिच्या अंगावरील भिंत बाजूला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सय्यद हीचा मृत्यू झाला होता. जखमी सय्यदला पाहून तिच्या नातलगांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यानंतर नागरिकांनी संतप्त होत जेसीबीवर दगडफेक केली. तसंच चालकाला मारहाणही केली. जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. नंतर याप्रकरणी स्थानिकांनी रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या घातला होता. याप्रकरणी नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यासह चार जणांवर मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
"लोकशाही अमान्य असलेले पळपुटे"
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल:
शिंदे गटाची धाकधूक वाढली; कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला...
शिंदे गटाची धाकधूक वाढली! कपिल सिब्बल यांच्या जोरदार युक्तीवादाला सुरुवात, कोर्टात काय काय घडतंय?
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने...
पुन्हा चर्चा रंगल्या! सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीने प्रवास, भाजप नेता म्हणाला...
शिंदेंच्या अनुपस्थितीमुळे एमएमआरडीएच्या कार्यक्रमावर चर्चांना उधाण
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
सिंधुदुर्गातील दोडामार्ग आमसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?