AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडकडून जप्त केलेलं सीम अमेरिकेत रजिस्टर? आकाचं कनेक्शन आता थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत?

बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केली आहे. त्याच्याकडून जप्त झालेल्या मोबाईलमधील सीम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाल्मिक कराडकडून जप्त केलेलं सीम अमेरिकेत रजिस्टर? आकाचं कनेक्शन आता थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत?
वाल्मिक कराड
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 16, 2025 | 6:10 PM
Share

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. सीआयडी आणि एसआयटीचा या प्रकरणात सखोल तपास सुरु आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयीन समितीदेखील गठीत केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान आता सूत्रांकडून मोठी माहिती समोर येत आहे. आकाचं कनेक्शन आता थेट महासत्ता अमेरिकेपर्यंत? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण वाल्मिक कराड याच्याकडून जप्त करण्यात आलेलं सीम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडकडच्या मोबाईल जप्तीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे निवडणूक काळात याच सीममधून अनेक फोन झाल्याचा एसआयटीला संशय आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

“आका जो आहे तो सोपा आका नाही. या आकाकडे 17 मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. तो अमेरिकेचे सीम वापरत असेल. तो ते वापरत असेल. आका काय-काय नाही करु शकत? आकाचा बाका 50-50 लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता”, असा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी केला.

अंजली दमानिया यांचा धनंजय मुंडेंवर आरोप

दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. हत्या आणि खंडणी हा एकच गुन्हा आहे, असंदेखील अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

राजकीय वरदहस्त नसतं तर वाल्मिक कराड इतका मोठा कधी झालाच नसता. धनंजय मुंडेंनी कराडला पदोपदी वाचवलं नसतं तर तो इतका मोठा झालाच नसता. माझं सरळसरळ म्हणणं आहे की, ते दोन वेगळे नाहीत. एकच गुन्हा आहे. खंडणी पासून गुन्ह्याला सुरुवात झाली आणि याच गुन्ह्यातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांनी विरोध केला नसता तर त्यांची हत्याच झाली नसती. कारण खंडणी मागणं आणि दहशत निर्माण करणं एकच होतं. त्यातूनच ही हत्या झाली.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी