PHOTO: अख्खा गाव रात्री हलगीवर थिरकला, काय झालं काय विचारता? अहो मुलगी झाली, सव्वा क्विंटल जिलेबी वाटली…

माजलगावमधील मोठेवाडी येथील सारिका अशोक रासवे यांना मुलगी झाल्यानंतर या दाम्पत्याने हा आनंद गावकऱ्यांसोबत साजरा केला. गावकऱ्यांनीदेखील रात्रीतून एकत्रित येत रासवे दाम्पत्याच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् अवघ्या गावाला एखाद्या महोत्सवाचं रुप आलं होतं.

PHOTO: अख्खा गाव रात्री हलगीवर थिरकला, काय झालं काय विचारता? अहो मुलगी झाली, सव्वा क्विंटल जिलेबी वाटली...
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 12:02 PM

बीडः वंशाला दिवा पाहिजे म्हणून हट्ट करणारी, प्रसंगी मातेचा जीवही घेणारी मंडळी तुम्ही पाहिली असेल. पण इथे तर मुलगी झाली (Girl child birth) म्हणून एका कुटुंबाला एवढा आनंद झाला की अख्ख्या गावाला त्यांनी रात्रीतून जागं केलं. आपल्या आनंदात सहभागी करून घेतलं. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव (Majalgaon Beed) तालुक्यात ही घटना घडली. माजलगावमधील मोठेवाडी येथील सारिका अशोक रासवे यांना कन्यारत्न प्राप्त झाले. शुक्रवारी रात्री मुलीचा जन्म झाला अन् कुटुंबाच्या आनंदाला (celebration) पारावार उरला नाही. कारणही तसंच आहे. या तब्बल 36 या कुटुंबात मुलीचे आगमन झाले. या आनंदात मुलीचे वडील अशोक रासवे यांनी तब्बल सव्वा क्विंटल जिलेबी गावात वाटली. रासवे दाम्पत्याच्या या आनंदात संपूर्ण मोठेवाडी गावही सहभागी झाला, हे जास्त विशेष.

माजलगावमधील मोठेवाडी येथील सारिका अशोक रासवे यांना मुलगी झाल्यानंतर या दाम्पत्याने हा आनंद गावकऱ्यांसोबत साजरा केला. गावकऱ्यांनीदेखील रात्रीतून एकत्रित येत रासवे दाम्पत्याच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला अन् अवघ्या गावाला एखाद्या महोत्सवाचं रुप आलं होतं.

रासवे कुटुंबियांनी अवघ्या गावाला जागं करत हा आनंद साजरा करण्याचं कारण महत्त्वाचं आहे. या कुटुंबात तब्बल 36 वर्षांनी कन्यारत्नाचं आगमन झालं. त्यामुळे कुटुंबियांना हा जन्म उत्साहात साजरा केला.

मुलगी जन्माला आल्यामुळे रासवे कुटुंबियांना अवघ्या गावाचं तोंड गोड केलं. रात्रीतून तब्बल सव्वा क्विंटल जिलेबी गावात वाटली गेली.

इतर बातम्या-

“असं वाटलं अख्खं जग थांबलं”, विकेंडला बिग बीचे ‘हे’ पाच ट्विट तुम्हाला आयुष्याबद्दल बरंच काही सांगून जातील…

Nagpur Crime | विदर्भात पुन्हा बहेलिया शिकाऱ्यांचा शिरकाव?, दोन बिबटे जाळ्यात अडकल्याने चिंता वाढली