AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde | ‘माझ्या मुलाचा परदेशातून फोन आला, मम्मी ते पैसे तू घेणार आहेस का?’, पंकजा यांनी नेमका किस्सा काय सांगितला?

"भगवान बाबांच्या साक्षीने मी सांगते. माझ्या मुलाला मी सांगितलं, मला वाटत होतं की, माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. मी त्यादिवशी माझ्या मुलाला सांगितलं की, बेटा तुझ्याआधी ही लोकं माझ्याजवळचे आहेत", असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

Pankaja Munde | 'माझ्या मुलाचा परदेशातून फोन आला, मम्मी ते पैसे तू घेणार आहेस का?', पंकजा यांनी नेमका किस्सा काय सांगितला?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 24, 2023 | 4:53 PM
Share

बीड | 24 ऑक्टोबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगावमध्ये भगवान बाबा गडावरुन आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात कारवाई करण्यात आली तेव्हा कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी दोन दिवसांत 11 कोटी रुपये जमा केले, असं सांगितलं. याबाबत विदेशात शिक्षणासाठी गेलेल्या आपल्या मुलाला माहिती मिळाली. त्याने आपल्याला मम्मी तू ते पैसे घेशील का? असा प्रश्न विचारला. त्यावर पंकजा यांनी काय उत्तर दिलं, याबाबत पंकजा यांनी आज जाहीरपणे भाष्य केलं.

“माझ्या आयुष्यात मी एखाद्या निवडणुकीत पडली असेल तरी मी तुमच्या नजरेत पडली का? तुम्हाला लाज वाटेल, अपमान वाटेल, असं कृत्य मी केलं नाही म्हणून तुम्ही उन्हातान्हात येऊन बसता. इथे आलेला एका जातीचा माणूस नाही. धनगर समाज, माळी, मराठा, मुस्लिम समाजाचे बांधव आले आहेत. इथे शेती करणारे किती लोकं आहेत. तुम्हाला अनुदान मिळालं का? शेतमजुरी करणारे लोकं आहेत. शेतकऱ्याकडे मजुरी द्यायला काम आहे का? ऊसतोड मजूर आहेत. आता पैसा वाढवून दिलं पाहिजे की नाही? आता त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“माझा आवाज कुणी दाबू शकणार नाही. महाराष्ट्रात आज एवढे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर असताना, ओबीसींच्या मनात अनेक प्रश्न आहेत, या सरकारकडे जनतेला खूप अपेक्षा आहेत. अपेक्षाभंगाचं दु:ख आता कोणताही समाज भोगू शकत नाही”, असं पंकजा आपल्या भाषणात म्हणाल्या.

‘त्यादिवशी माझ्या मुलाने मला फोन केला आणि…’

“शिवपरिक्रमा यात्रेत लोकांनी माझ्यावर जेसीबीच्या फुलांनी वर्षाव केला. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. मुंडे साहेबांना काम करत असताना त्यांना कधीच वाटलं नव्हतं की देशाचे मुख्यमंत्री होतील. त्यांनी कष्ट केलं. त्यांनी मला राजकारणात आणलं तेव्हा एकच गोष्ट सांगितली, पंकजा तुझ्या पदरात या राज्याची जनता टाकतो”, असं पंकजा म्हणाल्या.

“ज्यादिवशी तुम्ही 11 कोटी रुपये जमा करत होते त्यादिवशी माझ्या मुलाने मला फोन केला आणि सांगितलं, मम्मी हे एवढे पैसे यांनी जमा केले. मम्मी ते पैसे तू घेणार आहेस का? मी म्हटलं, मी एवढे पैसे घेणार नाही. पण त्या लोकांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय राहणार नाही”, असं पंकजा यांनी सांगितलं.

“भगवान बाबांच्या साक्षीने मी सांगते. माझ्या मुलाला मी सांगितलं, मला वाटत होतं की, माझ्या कुटुंबाचा माझ्यावर हक्क आहे. मी त्यादिवशी माझ्या मुलाला सांगितलं की, बेटा तुझ्याआधी ही लोकं माझ्याजवळचे आहेत. जेवढा तू माझी जबाबदारी आहेस, त्याहून काकणभर जास्त हे माझी जबाबदारी आहेत. जेवढं प्रेम तू माझ्यावर आई म्हणून करतोस त्यापेक्षा जास्त प्रेम हे माझ्यावर करतात”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“तुम्ही का म्हणून माझ्यावर एवढं प्रेम करता? मला मिळालेलं शेवटचं मंत्रीपद सांगा. ग्रामीण विकास. तुमच्या गावागावात ग्रामपंचायत कार्यालय दिलंय की नाही? गावागावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली की नाही? जलसंधारणातून बंधारे केले की नाही? काम करताना तुम्हाला चपला झिझाव्या लागल्या का? बोलावून बोलावून सर्वांना दिलं. जेवढं मी परळीसाठी केलं तेवढंच पाथर्डीसाठी केलं”, असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?