AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

80 रुपये रोजंदारी ते दारी उभी आहे ऑडी; बीड जिल्ह्यातील तरुणाने शॉर्क टँक इंडियात नाव गाजवले; फिल्मी कसली वाचा ही अस्सल स्टोरी

Dadasaheb Bhagat Success Story : ‘सक्सेस के पीछे मत भागो, एक्सीलेंस का पीछा करो, सक्सेस झक मारके तुम्हारे पीछे आएगी’, थ्री इडियट्स या चित्रपटातील हा डायलॉग आठवतोय ना? मग बीड जिल्ह्यातील कधीकाळी रोजंदारीवर काम करणाऱ्या आजच्या या युथ आयकॉनची यशोगाथा तुम्ही वाचायलयाच हवी...

80 रुपये रोजंदारी ते दारी उभी आहे ऑडी; बीड जिल्ह्यातील तरुणाने शॉर्क टँक इंडियात नाव गाजवले; फिल्मी कसली वाचा ही अस्सल स्टोरी
घामाला फुटले मोती, यशोगाथा दादासाहेब भगतची
| Updated on: May 14, 2024 | 2:04 PM
Share

‘यशामागे कशाला धावता, उत्कृष्टतेचा ध्यास धरा, यश तुमच्या पाठी पळत येईल.’ 3 idiots चित्रपटातील हा डायलॉग मात्र तुम्ही घोकंपट्टी करावा असाच आहे. कारण बीड जिल्ह्यातील या तरुणाने हाच कित्ता गिरवला. त्याने इतिहास घडवला. घरची हालकीची परिस्थिती असताना कधी काळी विहीर खोदण्याच्या कामावर 80 रुपये रोजंदारी पण त्याने केले. पण मोठं होण्याचं स्वप्न त्यानं सोडलं नाही. मुंबई, पुणे, पुन्हा गावी ते शॉर्क टँकच्या तिसऱ्या सीझनचा त्याचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. दादासाहेब भगत असे या तरुणाचे नाव आहे. त्याची ही यशोगाथा तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

अशी झाली सुरुवात

  1. दोन-दोन स्टार्टअपचा सीईओ दादासाहेब भगतची ही कथा आहे. 1994 साली जन्मलेल्या दादासाहेबानं मेहनत आणि जिद्द कधीच सोडली नाही. इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून तो काम करत होता. नाईट शिफ्ट करावी लागत होती. त्याच दरम्यान त्याने पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमधून मल्टिमीडियाचा डिप्लोमा पूर्ण केला. कोर्स संपल्यानंतर त्याने मुंबईत रोटो आर्टिस्टसोबत काम केले. नार्निया आणि स्टारवॉर सारख्या हॉलिवूड चित्रपटासाठी काम केले. त्यानंतर हैदराबाद येथे ॲनिमेशन टीव्ही मालिका निन्जा हतोरीसाठी काम केले.
  2. पुन्हा मुंबईत येत त्याने मॅजिक अँड कलर इंकसोबत व्हिझ्युएल इफेक्ट आर्टिस्ट म्हणून काम केले. 2014 पर्यंत त्याने सुपरवायझर म्हणून काम केले. पुणे येथे फोकस टेक्नॉलॉजीमध्ये ग्राफिक्स स्पेशलिस्ट म्हणून काम केले. 2016 मध्ये त्याचा अपघात झाला आणि येथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
  3. तो अंथरुणाला खिळून होता. या दरम्यान फ्रीलान्सिंग कामाला त्याने सुरुवात केली. एक युनिक ॲनिमेशन डिझायन त्याने तयार केले. त्यावेळी त्याचा पगार 28 हजार रुपये होता. त्याने हे डिझाईन विकून 40 हजार रुपये कमावले आणि नोकरी सोडून याच कामावर लक्ष्य केंद्रीत केले.

तयार केली स्वतःची कंपनी

  1. दादासाहेब याने वर्ष 2016 मध्ये त्याचे पहिले स्टार्टअप नाईंथ मोशन (Ninth Motion) सुरु केले. हे स्टार्टअप ॲनिमेशन डिझाईन आणि डिजिटल आर्टसाठी काम करते. सुरुवातीला त्याने 10 ते 15 तरुणांच्या आधारे काम सुरु केले. यामाध्यमातून 2018-19 मध्ये त्याने 48 लाख नंतर 38 लाखांचा व्यवसाय केला.
  2. वर्ष 2020 मध्ये कोरोना दाखल झाला आणि दादासाहेबाला त्याचे पुण्याचे ऑफिस गुंडाळून बीडमध्ये यावे लागले. मग त्याला कमाल आयडिया सुचली. त्याने गावातच गुरांच्या गोठ्यात त्याचे कार्यालय थाटले. त्याची टीम पण तिथेच बोलावली. महामारीच्या काळात त्याने डूग्राफिक (DooGraphics) हे स्टार्टअप पण सुरु केले. एआयच्या माध्यमातून ग्राफिक्स डिझाईनचे काम सुरु केले. कॅन्हवा प्रमाणेच ते काम करते. गेल्यावर्षी त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर 1 कोटी रुपये इतका होता.
  3. भगत, शार्क टँकच्या सीझन- 3 मध्ये सहभागी झाली. त्याची संघर्षगाथा पाहुन जज सुद्धा भारावले. हा संघर्ष आणि एका खेड्यातून सुरु केलेल्या स्टार्टअप्सचा हा पसारा पाहुन ते पण प्रभावित झाले. जज अमन यांनी या स्टार्टअप्सचे 10 टक्के शेअर खरेदी केले. दादासाहेबाला पाठिंबा दिला.

गावातच मोठा बंगला आणि आलिशान कार

हा केवळ आर्थिक यशाचा प्रवास नव्हता. तर स्वप्न प्रत्यक्षात येणे काय असते, याची ही अनुभूती असल्याचे दादासाहेब भगत सांगतो. त्याने गावातच मोठा बंगला बांधला आहे. त्याच्याकडे नवा दमाच्या, युगाच्या आलिशान लान्सर, ऑडी आणि शेवरले क्रूझ या कार आहेत. त्याच्या आई-वडिलांना त्याचा कोण अभिमान आहे. मेहनतीने दादासाहेब या मुक्कामवर पोहचला आहे. त्याला अजून मैलाचा दगड रोवायचा आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.