
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गित्तेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोट्या गित्तेने थेट रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा दिला आहे. गोट्या गित्ते म्हणाला की, वाल्मिक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे, तर बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गित्तेने पोलिसांना शरण यावं.
शिवाय माझ्यावर आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी हे आरोप थांबवावेत. अन्यथा मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील असा इशारा या व्हिडिओमधून गोट्याने दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, आता गोट्या गित्ते देखील कृष्णा आंधळे सारखा सापडणार नाही सापडला तर त्याचा मृतदेह सापडेल अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
हा व्हिडिओ केवळ एक नाटक आहे गोट्या गित्तेकडून आत्महत्या करणार असल्याचं वधवुन जितेंद्र आव्हाडांवर खपवण्याचा डाव आहे. गोट्या गित्ते पोलिसांना सापडला तर अनेकांचे नावं समोर येतील यामुळे त्याला संपवलं जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. गोट्या गित्तेच्या व्हायरल व्हिडीओ जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, गोट्या गित्ते याच्या व्हायरल व्हिडीओनंतर खळबळ उडाली. महादेव मुंडे हत्या प्रकरणी पोलिसांनी काहींची चाैकशी केली. त्या आधारावर गुन्हे शाखेचे एक पथक गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यात अजून यश मिळाले नाहीये. गोट्या गित्तेला हा महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आहे.
गोट्या गित्तेच्या व्हायरल व्हिडीओनंतर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टिका केली असून तपास यंत्रणा काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित केला. गोट्या गित्तेकडून जितेंद्र आव्हाड यांना धमकी देण्यात आली आहे. गोट्या गित्तेच्या व्हायरल व्हिडीओनंतर बीड जिल्हा हा पुन्हा चर्चेत आल्याचे बघायला मिळाले.