AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde | ‘मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने नोटीस पाठवलीय. पंकजा यांच्या साखर कारखान्याने 19 कोटींचं जीएसटी कर थकवल्याचा दावा करण्यात आलाय.

Pankaja Munde | 'मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी', सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
supriya suleImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Sep 26, 2023 | 12:02 AM
Share

बीड | 25 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने नोटीस पाठवलीय. पंकजा यांच्या साखर कारखान्याने 19 कोटींचं जीएसटी कर थकवल्याचा दावा करण्यात आलाय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सध्या यूनियन बँकेच्या ताब्यात आहे. यूनियन बँकेने दिलेल्या 12 कोटींच्या कर्जाचे परतफेड न केल्याने या कारख्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलीय. त्यानंतर आता जीएसटी विभागाची नोटीस आलीय. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारने आपल्या मदत केली नाही म्हणत नाराजी व्यक्त केलीय.

‘मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी’

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. “भाजपचे दिवंगत वेते गोपीनाथ मुंडे आज हयात नाहीत म्हणून त्यांच्या लेकीशी तुम्ही कसेही वागाल? हा अन्याय आहे. कोणतंही राजकारण न करता या राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘मी जाहीर निषेध करते’

“पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी हयात असताना जेवढं भारतीय जनता पक्षाचं काम केलंय तेवढं करणारे महाराष्ट्रात नेते कमी असतील. सत्तेत नसताना पक्षासाठी खूप कष्ट केले. त्यांची मुलगी आज लढतेय. त्यांची मुलगी भारतीय जनता पक्षात आहे. त्या मुलीवर अन्याय करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष करतोय. याचा मी जाहीर निषेध करते”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“भाजपाच्या एका दिल्लीतील खासदाराचे घर जीएसटी आणि टॅक्स प्रॉब्लेममध्ये आलं होतं. मात्र भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा अदृश्य हाताने त्यांच्या घराचा लिलाव कसा थांबवला? असा सवाल उपस्थित सुप्रिया सुळे यांनी केला. एकीकडे बेटी पढाव आणि बेटी बचाव असा नारा ही लोकं देतात. मग पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?