पंकजा मुंडे रमल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये, चिमुकल्यांसह स्कूल बसमधून प्रवास

| Updated on: Sep 26, 2022 | 6:53 PM

पंकजा मुडे यांनी त्या स्कूलबसमधील प्रत्येक विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करत त्यांना प्रोत्साहित केले.

पंकजा मुंडे रमल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये, चिमुकल्यांसह स्कूल बसमधून प्रवास
पंकजा मुंडे विद्यार्थ्यांसोबत बसमधून प्रवास करतात तेव्हा...
Image Credit source: t v 9
Follow us on

संभाजी मुंडे, Tv9 मराठी प्रतिनिधी, परळी : भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची सर्वस्तरातील लोकप्रियता सर्वज्ञात आहे. चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्धापर्यंत पंकजा मुंडे लोकप्रिय नेत्या म्हणून परिचित आहेत. लोकांमध्ये मिसळण्याच्या बाबतीत आणि लोकांना आपलंसं करण्याच्या बाबतीत त्या नेहमीच अग्रेसर असतात. विशेष म्हणजे त्यांना स्वतःला अतिशय संवेदनशीलपणे व सकारात्मकतेने लोकांना भेटतात. त्यांच्यात मिसळणे त्यांना आवडते. विविध कार्यक्रम, प्रसंग व वेगवेगळ्या ठिकाणी याचा नेहमीच अनुभव येतो. असाच एक अनुभव आज परळीमध्ये बघायला मिळाला.

पंकजा मुंडे या परळी शहरातून जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत्या. त्याचवेळेला समोरून एका शाळेची स्कूल बस जात होती. पंकजा मुंडे यांना या स्कूलबसमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी “ताई, ताई ” म्हणून आवाज दिला.

विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहित

सर्वांनी पंकजाताईंना हात उंचावत अभिवादन केले. या विद्यार्थ्यांचा उत्साहच इतका ओसंडून वाहत होता की, पंकजाताईंनाही त्यांच्यात सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. पंकजा मुडे यांनी त्या स्कूलबसमधील प्रत्येक विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करत त्यांना प्रोत्साहित केले.

विद्यार्थ्यांशी साधला स्कूल बसमध्ये प्रवास

या स्कूलबसमधील सर्वच विद्यार्थ्यांचा प्रत्येकाला ताईंशी हस्तांदोलन करण्याचा मनोमन आग्रह दिसून आला. या चिमुकल्यांचा हट्ट पुरवत पंकजा यांनी चक्क स्कूल बसमध्येच प्रवेश केला.

सर्व विद्यार्थ्यांसमवेत या स्कूल बसमध्ये बसल्या. काही अंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत प्रवासही केला. या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत प्रत्येकाची चौकशी करत या चिमुकल्यांचा उत्साह वाढवला.