AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीसांनी सांगितलं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं कारण

या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता अभियानासाठी आल्याचा आनंद आहे.

अमृता फडणवीसांनी सांगितलं स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं कारण
अमृता फडणवीसांकडून मुंबईत स्वच्छता मोहीम Image Credit source: t v 9
| Updated on: Sep 26, 2022 | 6:15 PM
Share

Tv9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः अमृता फडणवीस सहभागी झाल्यात. मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाते. या मोहिमेत अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी हाती ब्रश घेऊन पुतळ्यावरून फिरविला. पुतळ्यावर बसलेली धूळ दूर केली. बाजूनं पाणी सोडण्यात आलं. गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम (Swachhta Mission) राबविण्यात आली. यापूर्वीच्या स्वच्छता मोहिमेतही अमृता फडणवीस या स्वच्छता मोहिमेत पाहायला मिळाल्या होत्या.

स्वच्छतेत लक्ष्मीचा वास

अमृता फडणवीस म्हणाल्या, नवरात्रीचा पर्व असून स्वच्छतेला महत्व दिलं जातं. या दिवशी गेटवे ऑफ इंडिया येथे स्वच्छता अभियानासाठी आल्याचा आनंद आहे. आपल्या घराप्रमाणेच आजूबाजूच्या परिसरात ही स्वच्छतेला महत्त्व द्यायला हवं.

स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा, सरस्वतीचा निवास आहे. एक विनंती करते सर्वांना महाराष्ट्राला स्वच्छ राज्य आणि मुंबईला सर्वात स्वच्छ शहर म्हणून पारितोषिक मिळायला हवं. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.

सुरक्षित माता अभियानावर अमृता फडणवीस म्हणाल्या, प्रत्येक घरातील माता सुरक्षित आणि शिक्षित असायला पाहिजे. प्रत्येक मातेची प्रकृती चांगली व सुदृढ असायला हवी.

गरबा परवानगीबाबत

गरबा परवानगीबाबत अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, बारा वाजेपर्यंत परवानगी दिली तर मला स्वतःला आवडेल. मी स्वतः दांडिया खेळायला जाते. पण सरकारने कायदा व सुव्यवस्था पाहून निर्णय घ्यावा.

या स्वच्छता मोहिमेची पोस्टही अमृता फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्वीटक अकाउंटला पोस्ट केली होती. स्वच्छतेच्या त्या खऱ्या ब्राँड अम्बॅसिडर ठरल्या.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.