Pasha Patel : ‘निजामालाही 700 बायका, त्याला काय अर्थ आहे,’ गोपीनाथ मुंडेंच्या वारसावरून पाशा पटेल भलतेच बरळले

Pasha Patel Controversial Statement : गोपीनाथ मुंडे यांचा खरा राजकीय वारसदार कोण? यावरून गेल्या एका महिन्यात वादाचा पाट वाहत आहे. छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार मोर्चात वारसाचा विषय काढला नि त्यावर खलबत होत आता हा वाद भलतीकडंच वळला आहे.

Pasha Patel : निजामालाही 700 बायका, त्याला काय अर्थ आहे, गोपीनाथ मुंडेंच्या वारसावरून पाशा पटेल भलतेच बरळले
पाशा पटेल,गोपीनाथ मुंडे, महादेव जानकर
Updated on: Nov 02, 2025 | 11:57 AM

Gopinath Munde Legacy : गोपीनाथ मुंडे यांचा खरा राजकीय वारसदार कोण? हा नवीन वाद राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ओबीसी महाएल्गार मोर्चा घेतला. त्यांनी आमदार धनंजय मुंडे यांना गोपीनाथ मुंडेंचा वारस म्हणून पुढे आणले. त्यानंतर महादेव जानकर, सारंगी महाजन, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांनी वारस कोण याच्यावर भाष्य केले. आताकृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि भाजप नेते पाशा पटेल यांनी केलेल्या वक्तव्याने वारसाचा हा वाद भलतीकडेच वळल्याचे समोर येत आहे.

महादेव जानकरांचे वक्तव्य काय?

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस आहेत हे मी सांगण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. भगवान गडावर जेव्हा भाषण झाले तेव्हा वारस पंकजा मुंडे असल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी सांगितल्याचा दावा जानकरांनी केला. तर जेव्हा ते आपल्या सभेला आले, तेव्हा मला त्यांनी मानसमूत्र मानले. त्यामुळे एक नंबरला पंकजा मुंडे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर प्रीतम मुंडे या आहेत. तीन नंबरला यशस्वी आहे. तर चार नंबरला महादेव जानकर आहे. असे वक्तव्य त्यांनी केले होते.

पाशा पटेलांचे वादग्रस्त विधान

भाजप नेते पाशा पटेल हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय मानल्या जातात. परळीत एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांना गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारस कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे खरेच वारसदार आहेत. एक मुलगी आहे. तर एक पुतण्या आहे, असे पटेल म्हणाले.

तर महादेव जानकर यांनी स्वतःला चौथे वारसदार म्हणून जाहीर केल्यावर ही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पण ही प्रतिक्रिया देताना पाशा पटेल भलतेच काही बरळले. जानकर वारस असल्याच्या दाव्यावर, “असे तर निजामालाही 700 बायका होत्या. त्याला काय अर्थ आहे.” असे वक्तव्य करुन पाशा पटेल यांनी वाद ओढावून घेतला.

कर्जमाफीवरही मोठे संकेत

त्याचवेळी पाशा पटेल यांनी कर्जमाफीवरही वेगळेच मत मांडले. आम्ही कर्जमाफी तारीख घेऊन आलो असंच बच्चू कडूंच्या मागणीत दिसलं. हे ते मागणी कोणीही करतय हे तर लोकप्रिय मागणी आहे आमच्या सरकार येताना सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू.आताच्या अतिवृष्टी पावसामुळे 32 हजार कोटी खर्च झाला शेतकऱ्यांना दिलं ते आणि आता एवढंच कर्ज आहे. पुन्हा शेतकऱ्यांना मदत दिली. आता तिजोरीकडं बघून लगेच कर्जमाफी करणं शक्य नाही, असे पाशा पटेल म्हणाले. तर परळी येथे असलेल्या औष्णिक वीज केंद्राच्या (थर्मल पावर स्टेशन) ५०० एकर जागेवर बांबू लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.