“या जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता” ; शोधून काढणाऱ्याला मिळणार इतक्या हजारांचे बक्षीस

| Updated on: Apr 29, 2023 | 8:09 PM

या वर्षी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तरीही शासनाकडून योग्य ती मदत अजूनही मिळाली तर नाहीच मात्र लोकप्रतिनिधी असलेले सत्तेतील नेत्यानीही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

या जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता ; शोधून काढणाऱ्याला मिळणार इतक्या हजारांचे बक्षीस
Follow us on

बीड : मागील दोन महिन्यापासून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. गहू, मका, द्राक्षांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अवकाळी आणि गारपीटीनंतर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान देण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानुसार ज्या पिकांचे नुकसान झाले होते त्याची पाहणी करून पंचनामेही करण्यात आले मात्र अजूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

या कारणामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात जोरदार पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आता शेतकरी आणि सत्ताधाऱ्यांचा भविष्यात संघर्ष वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

बीड जिल्ह्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

मात्र बीडचे पालकमंत्री अतुल सावे हे अद्याप बीडच्या बांधावर गेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे.

संघटनेकडून पालकमंत्री बेपत्ता आहेत त्यांना शोधून काढणाऱ्या व्यक्तीला 51 रुपये बक्षीस देण्याचेही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

त्या आशयाचे पोस्टरदेखील गेवराई तालुक्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता पालकमंत्र्यांविरोधात आता बीड जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले आहे.

या वर्षी शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. तरीही शासनाकडून योग्य ती मदत अजूनही मिळाली तर नाहीच मात्र लोकप्रतिनिधी असलेले सत्तेतील नेत्यानीही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत.

लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यानेच आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावून लोकप्रतिनिधींविषयी असलेला राग व्यक्त करण्यात आला आहे.

स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदा हल्लाबोल केला आहे. त्यामुळेच त्यांनी पालकमंत्री बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावून सत्ताधाऱ्यांविरोधात त्यांनी सडकून टीका केली आहे.