AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिलेली’, कोर्टात सर्वात मोठा दावा, वाचा A टू Z युक्तिवाद

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीच वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झालं. जवळपास 10 मिनिटे त्यांच्यात संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. विशेष म्हणजे हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती, असा देखील मोठा युक्तिवाद एसआयटीने कोर्टात केला.

'हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिलेली', कोर्टात सर्वात मोठा दावा, वाचा A टू Z युक्तिवाद
walmik karad
| Updated on: Jan 15, 2025 | 3:53 PM
Share

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा होताना दिसत आहे. राज्य सरकारने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जी एसआयटी नेमली आहे, या एसआयटीने आज कोर्टात मोठा दावा केला आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याचं नाव चर्चेत होतं. त्याला खंडणी प्रकरणात अटक देखील करण्यात आली होती. खंडणी प्रकरणात त्याला काल न्यायालयीन कोठडी मिळाली होती. यानंतर एसआयटीने कोर्टात महत्त्वाची माहिती दिली. आरोपीचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात धागेदोरे असल्याचा दावा करत एसआयटीने त्यालादेखील या प्रकरणात आरोपी बनवल्याचं एसआयटीने स्पष्ट केलं. तसेच कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला. एसआयटीने मकोका कोर्टात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज मकोका कोर्टाने मान्य केला. त्यामुळे प्रोडक्शन वॉरंटच्या माध्यमातून वाल्मिक कराड याचा ताबा घेण्याचा मार्ग एसआयटीला मिळाला. यानंतर वाल्मिक कराड याची कोठडी मिळावी यासाठी एसआयटीने वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर केलं. यावेळी एसआयटीने कोर्टात युक्तिवाद करताना मोठे खुलासे केले.

या प्रकरणात एसआयटीने सर्वात मोठा युक्तिवाद केला की, संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराडचं या प्रकरणातील इतर आरोपींसोबत फोनवर संभाषण झालं होतं. संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झालं होतं, असा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 मिनिटे या काळात वाल्मिक कराडचं आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर वारंवार संभाषण झालं. जवळपास 10 मिनिटे त्यांच्यात संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. विशेष म्हणजे हत्या झाली त्याच दिवशी वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिली होती, असा देखील मोठा युक्तिवाद एसआयटीने कोर्टात केला.

सरकारी वकिलांचे मोठे दावे

एसआयटीने वाल्मिक कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली. विशेष म्हणजे सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराडवर याआधी दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर करण्यात आली. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींविरोधातही गुन्हे दाखल आहेत. यावेळी सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराडवर मकोका का लावण्यात आला याचा संदर्भ देण्यात आला. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी ९ ते १० ग्राउंडस मांडले. बीडच्या मकोका कोर्टात इन कॅमेरावर सुनावणी सुरू झाली. कोर्टरूममध्ये फक्त न्यायाधीश, आरोपी, आरोपीचे वकील, तपास अधिकारी आणि सरकारी वकील उपस्थित होते.

आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि मग हत्या केली आहे. या गुन्ह्यातले आरोपी सराईत आहेत त्यांची आधीही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे, असा युक्तिवाद एसआयटीच्या वकिलांनी केला. आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. त्याला लपण्यासाठी आरोपींनी मदत केली आहे का? हे तपासायचे आहे. तीन आरोपींमध्ये १० मिनिटे नेमकं काय संभाषण झालं हे तपासायचं आहे. विदेशातील मालमत्तेबाबत चौकशी सुरू आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यामध्ये इंटरलिंक्स काय आहेत? याचा तपास सुरू आहे. फार आरोपी अजून सापडायचे आहेत. कृष्णा आंधळे याला लपवण्यात यांचा हात आहे का? याची माहिती घ्यायची आहे. घुले आणि चाटे अनेक दिवस फरार होते. त्यांना कोणी मदत केली? याची माहिती घेणं सुरू आहे, असं सरकारी वकील कोर्टात म्हणाल्याची माहिती समोर येत आहे.

‘वाल्मिक कराडची अटक बेकायदेशीर’, वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद

आरोपी वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी देखील यावेळी युक्तिवाद केला. “कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही. वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे”, असा मोठा दावा आरोपींच्या वकिलांनी केला.

न्यायाधीशांचा तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न विचारला. फक्त फोन कॉलवर आरोपीला दोन्ही गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आले आहे का? हत्या आणि खंडणी प्रकरणात फोन कॉलच्या बेसिसवर आरोपी बनवले आहे का? असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. न्यायाधीशांकडून तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे याची खात्री केली होती का? असा देखील सवाल कोर्टाने केला.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.