Walmik Karad : फरसाण, चिकन ते तेल लावलेल्या चपात्या! वाल्मिक कराडची तुरुंगात बडदास्त, तुरुंगातून बाहेर आलेल्या रणजीत कासलेंचा दावा काय
Walmik Karad in Beed Jail : बीड तुरुंगात वाल्मिक कराड याची मोठी बडदास्त ठेवल्या जात असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेंनी केला आहे. यापूर्वी सुद्धा वाल्मिक अण्णासाठी पोलीस आणि अधिकारी राबत असल्याचे उघड झाले आहे.

Dismissed Police Sub-Inspector : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या तुरुंगात आहे. यापूर्वी त्याला जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत आल्याचे समोर आले होते. प्रकरणात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर कारवाई पण झाली होती. आता बीड तुरुंगात वाल्मिक अण्णाला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने केला आहे. त्याच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.
वाल्मिकला सर्व सोयी-सुविधा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर जनरेट्यापुढे झुकत पोलिसांनी तपास केला आणि प्रकरणातील आरोपींना अटक केली. कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक कराड याला बीडमधील कारागृहात ठेवण्यात आले आहे. वाल्मिकला याठिकाणी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात असल्याचा दावा कासले याने केला आहे. त्याला सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्याचे कासलेने स्पष्ट केले आहे.
फरसान, चिकन, व्हीआयपी ट्रीटमेंट
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा जामिनावर बाहेर आला आहे. त्याने बाहेर येताच शनिवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्याने वाल्मिकला तुरुंगात सर्व सोयी-सुविधा मिळत असल्याचा दावा केला. वाल्मिकला फरसान, तेल लावलेल्या चपात्या, बुधवारी आणि रविवारी चिकन दिले जात असल्याचा दावा कासले याने केला.
वाल्मिकच्या जीवाला धोका
वाल्मिक कराडला तुरुंगात सर्व सोयी-सुविधा मिळत आहे. त्याला नागपूर अथवा पुण्याच्या तुरुंगात हलवा. त्याच्या जीवाला बीड कारागृहात धोका असल्याचा दावा कासले याने केला. अंजली दमानिया, करुणा मुंडे, तृप्ती देसाई यांच्याकडे याविषयीची त्यांनी विनंती केल्याचे, त्याने सांगितले. तुरुंगात गेल्यावर आपल्याला प्लास्टिकच्या कपात चहा देण्यात आला. तर वाल्मिकला खास कपात चहा देण्यात आला, याची आठवण त्याने यावेळी करून दिली. तर वाल्मिकच्या जीवाला धोका असल्याचा दावा कासले याने केला आहे. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा जामिनावर बाहेर आला आहे.
