
“मराठ्यांच्या आरक्षणाला कुठही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. आमचं आरक्षण हक्काच आहे. बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये, एवढी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. मराठ्यांच आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ होईल असं एकही पाऊल आपण जातीयवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी जो जीआर केलाय तो रद्द करण्याची आमची मागणी आहे. “त्याचं कोण ऐकतय बुगळ्याच त्या. त्या लाल्याने सांगितलं असेल, दिल्लीत गांधी एक लाल्याने सांगितल असेल, मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून. कारण काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“ओबीसींचा नेता कोणी नाही. जास्त बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांना यांची औकात कळली आहे. हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलय. त्यामुळे बापाची पेंड आहे का? जीआर रद्द करणं. हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढलाय. आमची पण मागणी आहे, 1994 चा जीआर रद्द करा. वरच 2 टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असं सांगितलं की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाच आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तशी फाईट होणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पळायलाही जागा उरणार नाही
“ओबीसीत 400-500 जाती आहेत. छगन भुजबळ थोड्या माळ्यांचा नेता आहे, सगळ्या माळ्यांचा नाही. हे जातीचे नेते आहेत, यात ओबीसींचा संबंध नाही. काही गरज नाही याच्या मागेमागे पळायची. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगणं आहे की, मराठ्यांच्या आरक्षणाच्या जीआरचा अवमान होईल, अस् त्यांचं ऐकून पाऊल उचलायच नाही. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमची प्रमाणपत्र थांबवू नका. दिवाळीच्याआधी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. अन्यथा पुन्हा सरकारसाठी आंदोलनाचा वाईट दिवस येईल . तुम्ही मजा बघत असाल, आज करु, उद्या करु. तर फडणवीस आणि विखे तुमच्या नरड्यावर येईन, पळायलाही जागा उरणार नाही“ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.