बेळगावमध्ये काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Belgaum Fire Accident: देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सर्वत्र आहे. गणेश चतुर्थीच्याच रात्री मात्र एक दुर्दैवी अपघात झाला.

देशभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सर्वत्र आहे. गणेश चतुर्थीच्याच रात्री मात्र एक दुर्दैवी अपघात झाला. बेळगावमधील चव्हाट गल्लीत काळीज पिळवटून टाकणारी घटनी घडली. एका दुकानाला आणि घराला भीषण आग लागली. या भीषण आगीत कुटुंबातील चार जणांचा जागीच होरपळून दुर्दैवी अंत झाला. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
एका स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास दमोने यांच्या घरातून अचानक आगीच्या तीव्र ज्वाळा बाहेर पडत होत्या. काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. आगीने संपूर्ण घराला वेढा घातल्याचे पाहायला मिळाले. घरामधील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्दैवी दुर्घटनेत गजानन दमोने (६५), शारदा दमोने (४५), भारती दमोने (५०) आणि रोशन दमोने (२१) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर प्रिया दमोने (२८) आणि गंगा दमोने (२५) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत, या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
