AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जायचं तरी कुठं? घरात पाणी, शहरात पाणी पण घशाला कोरड! हॉटेलात एका रात्रीचे 40 हजार, आयटी हब संकटात!

आयटी हब बंगळुरूमध्ये पाऊस आणि पूरस्थितीनं उग्र रुप धारण केलंय. नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. अशात हॉटेल्समध्येही किराया दुप्पट करण्यात आलाय. त्यातच हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.

जायचं तरी कुठं? घरात पाणी, शहरात पाणी पण घशाला कोरड! हॉटेलात एका रात्रीचे 40 हजार, आयटी हब संकटात!
बंगळुरूत पूरस्थितीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. Image Credit source: social media
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 08, 2022 | 2:09 PM
Share

भारताची सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूत पावसानं (Bangalore rain) थैमान घातलंय. शहरातील बहुतांश घरात पाणी शिरलंय. कंपन्यांचे हाल बेहाल झालेत. जिथे-तिथे पाण्याचा शिरकाव (Flood situation) झाल्यानं पायाभूत सुविधा वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. अनेक भाग आणि अपार्टमेंट जलमग्न झालेत. लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पावसामुळे काही ठिकाणी वीज गुल झालीय. सगळीकडे पाणी आहे, पण पिण्याच्या पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरु आहेत.

बंगळुरूत ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबलंय, तिथून ते हटवण्यास सुरुवात झाली आहे. पण जनजीवन विस्कळीत झालंय. आउटर रिंग रोड तसंच मरथाहल्ली आणि जवळपास भागात पाणी तुंबलेलंच आहे. घरांवरचं संकट पाहता हॉटेल व्यावसायिकांनीही दुप्पट भाडे केले आहेत.

हवामान विभागाने तर आज आणि उद्याही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.

मागील चार दिवसात बंगळुरूत 251.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी 131.6 मिलीमीटर पाऊस रविवारी झाला.

अनेक नागरिक हॉटेलमध्ये राहणे पसंत करत आहेत. पण एका रात्रीचं भाडं 30 ते 40हजार रुपयापर्यंत झालंय. आधी ते 10 ते 20 एवढं होतं. तर OYO नेही खोल्यांचं भाडं वाढवलंय.

काही भागातलं पाणी उपसण्यात आलंय. इतरत्र मुक्कामी गेलेले लोक परतत आहेत. घरात काय काय नुकसान झालंय, त्याची पाहणी, साफ-सफाई सुरु आहे.

अनेक ठिकाणचे जनरेटर, वीजची बॅक अपची उपकरणं खराब झालीत. मोठ्या मशीन्समध्ये पाणी शिरल्याने त्या खराब झाल्यात.

येमालूरजवळील एका व्यक्तीने सांगितलं, सध्या परिस्थिती सुधारत आहे. पण तुंबलेलं पाणी काढण्यासाठी पंपांची कमतरता भासतेय. पाणी ओढणाऱ्या मोटर्सची मागणी वाढली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, पूरस्थितीवर उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने विशेष अनुदान दिले पाहिजे.

राज्यात पूरस्थितीसाठी आधीच 600 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यापैकी 300 कोटी रुपये फक्त बंगळुरूसाठी आहेत.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान