AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्ड फ्लूच्या सावटातही पोल्ट्री फार्ममधून 400 कोंबड्यांची चोरी

सिरसोली गावातील संजीव मुरकुटे यांच्या पोल्ट्री फार्म मधून तब्बल 400 कोंबड्यांची चोरी झाल्या आहेत. Bhandara four hundred hens theft

बर्ड फ्लूच्या सावटातही पोल्ट्री फार्ममधून 400 कोंबड्यांची चोरी
भंडाऱ्यात 400 कोंबड्यांची चोरी
| Updated on: Feb 02, 2021 | 4:03 PM
Share

भंडारा:  कोरोनाने कंबरडं मोडलेलं असताना जानेवारी महिन्यात पोल्टीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना बर्ड फ्लूच्या संकटामुळं नुकसान सहन करावं लागलं. हजारो कोंबड्या त्यामुळं मारुन टाकण्यात आल्या. मात्र, रविवारी रात्री भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात येणाऱ्या सिरसोली गावातील संजीव मुरकुटे यांच्या पोल्ट्री फार्म मधून तब्बल 400 कोंबड्यांची चोरी झाल्या आहेत. संजीव मुरकुटे यांच्या पोल्ट्रीमधून 400 कोंबड्या चोरीला गेल्यानं शिरसोली गावात खळबळ उडाली आहे.  यासंदर्भात मुरकुटे यांनी आंधळगाव पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.( Bhandara four hundred hens theft from poultry of farmer in Shirsoli village)

आपण चोरीच्या अनेक घटना पाहतो कुठे दागिने,कुठे पैसै,तर कुठे मोटरसायकल अशा विविध चोऱ्या होताना ऐकतो .मात्र आता पोल्ट्री फॉर्म मधून कोंबड्या चोरी होताना कधी ऐकलं काय? पण हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील शिरसोली गावात ही घटना घडली आहे. संजीव मुरकुटे हे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. ते मागील अनेक वर्षापासून पोल्ट्रीचा व्यवसाय करतात.

कोरोना, बर्ड फ्लू नंतर चोरी संकटाची मालिका सुरुच

रविवारच्या रात्री संजीव हे पोल्ट्री फार्म मधून घरी परतले आणि सोमवारी सकाळी पोल्ट्री फार्म वर जाऊन पाहिल्यावर त्यांनी पोल्ट्री फॉर्म मधील दाराचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आलं.  संजीव मुरकुटे यांनी पोल्ट्रीमध्ये जाऊन पाहिलं असता त्यांना कोंबड्या चोरीला गेल्याचे समजलं. या घटनेमुळे त्यांना धकाच बसला. संजीव मुरकुटे यांनी आंधळगाव पोलीस स्टेशन गाठत अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

आधीच कोरोनाच्या काळात पोल्ट्री व्यावसायिक डबघाईला आले आहेत. कोरोना आणि बर्ड फ्लूच्या संकटातून  कसे बसे सावरत असताना संजीव मुरकुटे यांनी नव्या जोमानं पोल्ट्री व्यवसाय सुरु केला.  बर्ड फ्ल्यूचं सावट असताना आता कोंबड्याचं चोरीला गेल्या आहेत. एका मागून एक अशी अनेक संकट पोल्ट्री व्यवसायावर येणार असतील तर पोल्ट्री व्यावसायिकांनी काय करावं हा प्रश्न निर्माण झाल्याचं संजीव मुरकुटे म्हणाले.

संजीव मुरकुटे यांनी या प्रकाराबद्दल आंधळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. 400 कोंबड्या चोरीला गेल्यानं 86 हजारांचं नुकसान झाल्याचं संजीव मुरकुटे म्हणाले.

संबंधित बातम्या: 

बर्ड फ्ल्यूमुळे अंडी आणि चिकनकडे पाठ; खवय्यांचा मटण आणि माशांवर ताव!

राज्यात बर्ड फ्लूच्या अफवेने शेतकऱ्यावर संकट, पोल्ट्री व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ

( Bhandara four hundred hens theft from poultry of farmer in Shirsoli village)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...