Accident | कारध्यात कंटेनरची दुचाकीला धडक, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

नितीन मिस्त्रीकाम करत होता. बुधवारी नितीनच्या बहिणाचे लग्न होते. रात्रीच्यावेळी त्यानं गळफास लावून आत्महत्या केली.

Accident | कारध्यात कंटेनरची दुचाकीला धडक, शिक्षिकेचा जागीच मृत्यू
accident
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 11:57 AM

नागपूर : भंडाऱ्यात भरधाव वेगात असलेल्या कंटेनरच्या चालकाने आपल्या ताब्यातील कंटेनरची दुचाकी अॅक्टिवाला धडक मारली. या अपघातात शिक्षिकेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पोलिस स्टेशन कारधा समोरील चौकात घडली. मृतक शिक्षिकेचे नाव रेखा नागोरी (वय 55) रा. भंडारा असे आहे.

कंटेनर चालकाला अटक

रेखा नागोरी ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. गुरुवारी सकाळी त्या अॅक्टिवाने भंडाराकडून इटगाव येथे जात होत्या. दरम्यान पोलिस स्टेशन कारधा समोरील चौकात त्या पवनी रोडने जाण्यासाठी वळत असतानाच भंडाराकडून साकोलीकडे भरधाव वेगात जात असणार्‍या कंटेनरने त्यांचे अॅक्टिवाला धडक दिली. यात रेखा नागोरी यांचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती होताच पोलिस स्टेशन कारधा येथील कर्मचारी व बाजूला उभा असणारा वाहतूक पोलीस यांनी अपघातस्थळी धाव घेतली. कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलीस वाहन पकडण्याच्या नादात

कारधा लहान पुलावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळं मोठ्या पुलावर वाहतूक कोंडी होते. कारधा टोलनाका ते वैनगंगा पुलावर नेहमी वाहतीक विस्कळीत असते. याचाच फटका बसतो. गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात शिक्षिकेला आपले प्राण गमवावे लागले. कारधा चौकात चारही बाजूनं रस्ते येतात. त्यामुळं वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागते. कोणत्या बाजूनं वाहन येईल, याचा काही नेम नसतो. येथील काही पोलीस वाहन पकडण्याच्या नादात जास्त दिसतात.

 

बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाची आत्महत्या

नागपूर – पारडीत बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावानं आत्महत्या केल्याची घटना घडली. गोंडपुरा येथील नितीन मेश्राम असं युवकाचं नाव आहे. नितीन मिस्त्रीकाम करत होता. बुधवारी नितीनच्या बहिणाचे लग्न होते. रात्रीच्यावेळी त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबीयांना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानं आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही.

Nagpur | मनपा शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट; शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

Nagpur Crime | 1 कोटी रुपयांची प्रतिबंधित सुपारी जप्त, ट्रान्सपोर्ट प्लाझा येथे गुन्हे शाखेनं टाकला छापा