Bhandara | शिक्षकांचे पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकाने दीड हजार रुपये मागितले; भंडाऱ्यातील उसऱ्याच्या मुख्याध्यापकाला अटक

| Updated on: Apr 24, 2022 | 12:12 PM

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे सोसायटी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज रामचंद्र कापगते (वय 55) आहेत. कापगते यांना 1500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली.

Bhandara | शिक्षकांचे पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकाने दीड हजार रुपये मागितले; भंडाऱ्यातील उसऱ्याच्या मुख्याध्यापकाला अटक
भंडाऱ्यातील उसऱ्याच्या मुख्याध्यापकाला अटक
Image Credit source: tv 9
Follow us on

भंडारा : उसर्रा येथील सोसायटी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील (Society School & Junior College) सहाय्यक शिक्षक संतोष गणेशप्रसाद पाठक यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. मुख्याध्यापक युवराज कापगते ( Yuvraj Kapgate) यांनी एप्रिल महिन्याचे पगार काढण्यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून 1 हजार 500 रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय पगार निघणार नाही असे सांगितले. सदर शाळा शंभर टक्के अनुदानित असल्याने कुठेही पैसे देण्याची गरज नाही, असं तक्रारकर्ते संतोष पाठक ( Santosh Pathak) यांनी सांगितलं. लाचलुचपत पथकाचे अधिकारी सोनटक्के यांनी सापडा रचला. मुख्याध्यापक कापगते यास अटक केली आहे. मुख्याध्यापक कापगतेविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाची परवानगी

सहाय्यक शिक्षकांना पगार काढण्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपये मुख्याध्यापकाने मागितले. पण, शिक्षक पाठक यांनी लाच द्यायची नव्हती. त्यामुळं त्यांनी भंडाऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं धाव घेतली. शनिवारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापडा रचला. सकाळी अकरा वाजता उसर्रा येथे लाच घेताना मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. मुख्याध्यापकाच्या कक्षातच त्याला अटक केली. मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

गुरुजी तुम्हीसुद्धा

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे सोसायटी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज रामचंद्र कापगते (वय 55) आहेत. कापगते यांना 1500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली. शिक्षक हा पवित्र पेशा समजला जातो. परंतु, काही शिक्षक याला अपवाद आहेत. उसर्रा येथील मुख्याध्यापकाची हयात या पेशात गेली. सेवानिवृत्तीला फक्त तीन वर्षे बाकी होते. अशावेळी लाच घेताना त्याला अटक करण्यात आली. हे खरं असलं तरी मुख्याध्यापकाने स्वतःसाठी लाच मागितली की, संस्थेच्या संचालकांना द्यायची होती. याचा तपास करणं गरजेचे आहे. कारण काही शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापकांकडून वसुली करून स्वतःची शानशौकत करत असतात.

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक