AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Amravati Fire | कांडलीतील सिलिंडर गोदामाला भीषण आग; दोन किलोमीटरपर्यंत सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज

आज सकाळी आठ वाजताही ही घटना अचानक खूप मोठा आवाज झाला. हा आवाज कशाचा म्हणून नागिरकांमध्ये भीती पसरली. पाहतात तर काय, आगीचे लोळ दिसू लागले. ही आग एका सिलिंडरच्या गोदामाला लागली होती. सिलिंडचं गोदाम असल्यानं आग लागताच मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळं अजूनही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Video Amravati Fire | कांडलीतील सिलिंडर गोदामाला भीषण आग; दोन किलोमीटरपर्यंत सिलिंडरच्या स्फोटाचा आवाज
अमरावती जिल्ह्यातील कांडली येथील सिलिंडरच्या गोदामाला भीषण आग. सिलिंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज दोन किलोमीटरपर्यंत दणाणला. Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 11:13 AM
Share

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूरमधील कांडली गावात सिलिंडरच्या गोडाऊनला (Cylinder Warehouse Fire) भीषण आग आज सकाळी लागली. गोडाऊनला आग लागल्याने आतापर्यंत 10 ते 11 सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गावालगतच गॅस एजन्सीचे (Gas Agency) गोडाऊन आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अग्निशमन दलाचे बंब (Fire Brigade) घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परतवाडा (अचलपूर) येथील कांडली गावामध्ये असणाऱ्या गॅस सिलिंडरच्या गोडाऊनमधील गॅस सिलिंडर आज सकाळी आठच्या दरम्यान अचानक फुटले. गोडाऊनमधील सिलिंडर स्फोट झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

दूरपर्यंत आगीचे लोळ

या स्फोटाची भीषणता आहे की जवळपास दोन किलोमीटर परिसरामध्ये स्फोटाचे प्रचंड आवाज नागरिकांना ऐकू आले. तर स्फोट झाल्यामुळे गोडाऊनमधून आगीचे लोट दूरदूरपर्यंत दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील कांडली ग्रामपंचायतमध्ये एचपी कंपनीचे गॅस गोडावून आहे. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अचलपूर अग्निशमन विभागाने ताबडतोब अग्निशमन बंब पाठवले. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ

आकाशात आगीचे लोळ

आज सकाळी आठ वाजताही ही घटना अचानक खूप मोठा आवाज झाला. हा आवाज कशाचा म्हणून नागिरकांमध्ये भीती पसरली. पाहतात तर काय, आगीचे लोळ दिसू लागले. ही आग एका सिलिंडरच्या गोदामाला लागली होती. सिलिंडचं गोदाम असल्यानं आग लागताच मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळं अजूनही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दोन किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज

या स्फोटाचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत पसरल्याचं नागरिक सांगतात. हा आवाज एकूण सर्वजण घाबरले. कुठे बाँबस्फोट तर झाला नाही, ना असं काहींना वाटलं. बरेच जण घराबाहेर आले. सिलिंडर गोदामाला आग लागल्याचं त्यांना दिसलं. या आगीची तीव्रता खूप होती. त्यामुळं आगीचे लोळ आकाशात दिसत होते. अग्निशमन यंत्रणा कामाला लागली. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Amravati Shiv Sena | राणांचे हनुमान चालीसा वाचन स्थगित, अमरावतीत फटाके फोडून शिवसैनिक परतले

Sanjay Raut | खासदार बाई यांचा हिंदुत्वाचा संबंध काय? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर घणाघात

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.