Bhandara Crime : भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेले, 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

| Updated on: Aug 01, 2022 | 9:59 PM

मुलगी अल्पवयीन असताना पळवून नेल्याने कवळू विरोधात पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळं त्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा मिळाली.

Bhandara Crime : भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेले, 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेले, 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Follow us on

भंडारा : एका अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या 29 वर्षीय तरुणाला 10 वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा (Punishment of Fine) ठोठावण्यात आली आहे. कवळू मायगू सिंदीमेश्राम रा. शिवनाळा (Shivnala) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. हा निर्णय भंडारा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. जी. तिजारे यांनी दिला. 4 जुलै 2018 रोजी कवळू सिंदीमेश्राम याने अल्पवयीन मुलीच्या नातेसंबंधाचा फायदा घेतला. तिच्याशी ओळख वाढवली. यातूनच पैशाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. तसेच तिला धमकी देऊन तिच्या कुटुंबातील व्यक्तीला फसवून टाकेन, असे बोलत धमकी दिली. याप्रकरणी मुलीने आईवडिलांना याची माहिती दिली. त्यावरून पवनी पोलीस (Pavani Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला.

पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षा

तपास पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके यांच्याकडे देण्यात आला. प्राथमिक तपासाअंती आरोपी कवडूवर पोक्सो व विविध कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला. अखेर सुनावणीदरम्यान आरोपी कवडू दोषी सिद्ध झाला. कवळू सिंदीमेश्राम यास कलम 6 पोक्सो एक्ट 2012 भादंवि अंतर्गत 19 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. याशिवाय पोक्सो एक्टअंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड, तर कलम 12 पोक्सो एक्टअंतर्गत 3 वर्षे व कलम 363 अंतर्गत 3 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

कवळू हा एकोणतीस वर्षांचा युवक. त्याने एका अल्पवयीन मुलीला आमिष दाखविले. त्यानंतर तिला पळवून नेले. घरच्यांनी पवनी पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. मुलगी अल्पवयीन असताना पळवून नेल्याने कवळू विरोधात पोक्सा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. न्यायालयात हा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळं त्याला दहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा मिळाली.

हे सुद्धा वाचा