भंडारा: दोन गटात तुंबळ हाणामारी; एकाची धारदार शस्त्राने हत्या
भंडारा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. डॉ. आंबेडकर वार्डात रविवारी मध्यरात्री उशीरा हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडालीये. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची चर्चा आहे.

भंडारा : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादात एकाची हत्या करण्यात आली. डॉ. आंबेडकर वार्डात रविवारी मध्यरात्री उशीरा हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडालीये. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची चर्चा आहे. मैदू पाटील असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर उमेश सोनकुसरे वय 20 वर्ष असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उमेश याने मैदू पाटील यांच्यावर चाकून वार करत त्यांचा खून केला.
लग्नात झाला राडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री शहरातील डॉ. आंबेडकर वार्डामधील नगर परिषदेच्या हॉलमध्ये एका विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नात सहभागी होण्यासाठी मैदू पाटील आणि आरोपी उमेश सोनकुसरे हे आपल्या मित्रांसोबत आले होते. दोघांची भेट होताच वादाला सुरुवात झाली, प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. याच वेळी सोनकुसरे याने आपल्या जवळीत धारदार शस्त्राने पाटील यांच्यावर वार केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मुख्य आरोपीला अटक
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी उमेश सोनकुसरे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील अन्य आरोपी फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित बातम्या
VIDEO | कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई
Navi Mumbai Accident | रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 3 ते 4 वेळा उलटली, एकाचा मृत्यू