Bhandara Crime | बारावीत गुण कमी मिळाले, विषारी औषध घेतले, भंडाऱ्यातील विद्यार्थिनीने स्वतःला संपविले

घरी तादंळाला अळ्या लागू नये म्हणून बोरीक पावडर आणला जातो. तो तांदुळ चांगले ठेवतो. त्यात विषयुक्त तत्व असतात. त्यामुळं तांदळाला अळ्या लागत नाही. घरी तो पावडर होता. तो पावडर मयुरीनं सेवन केला. यामुळं तिच्या अंगात विष भिनले. ही बाब लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत विष तिच्या शरीरात भिनलं होतं. त्यामुळं शेवटी मयुरीचा मृत्यू झाला.

Bhandara Crime | बारावीत गुण कमी मिळाले, विषारी औषध घेतले, भंडाऱ्यातील विद्यार्थिनीने स्वतःला संपविले
भंडाऱ्यातील विद्यार्थिनीने स्वतःला संपविले
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 10:26 AM

भंडारा : मयुरी किशोर वंजारी (Mayuri Vanjari) (वय 17) ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी. मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांचा भविष्यात आधार बनता यावा या दृष्टीकोनातून मयुरीची वाटचाल होती. मयुरीने शिकवणीविना (Without Tuition) घरीच अभ्यास करून परीक्षा दिली. तिला निकालाची उत्सुकता होती. काल दुपारी निकाल घोषित झाला. तिला 55 टक्केच गुण मिळाले. निकाल बघून ती प्रचंड निराशा झाली. आपण आपल्या आई-वडिलांसाठी काहीच करु शकत नाही, असा नकारात्मक विचार तिच्या मनात आला. तिने स्वत: ला संपविण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून तांदळाला लावायचे औषध (Medicine) (पावडर) सेवन केले.

उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा भंडारा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलीस घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मयुरीनं गुण कमी मिळाल्यानं हा घातक निर्णय घेतला. पण, यामुळं तिच्या आई-वडिलांना अधिकच दुःख झाले.

स्वप्नांचा झाला चुराडा

बारावीचा निकाल लागल्यानंतर काही जणांचा निकाल मनाजोगा लागला. तर काहींच्या हाती निराशा आली. या निराशेत भर पडली ती लाखनीच्या विद्यार्थिनीची. निकाल पाहून ती हादरून गेली. एवढे कमी गुण कसे मिळाले हे तिला समजेना. मी घरच्यांना आता काय सांगणार. त्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला, अशी भीती तिच्या मनात होती. या भीतीतूनच तीनं स्वतःला संपविण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा

तांदळाला लावायचे पावडर खाल्ले

घरी तादंळाला अळ्या लागू नये म्हणून बोरीक पावडर आणला जातो. तो तांदुळ चांगले ठेवतो. त्यात विषयुक्त तत्व असतात. त्यामुळं तांदळाला अळ्या लागत नाही. घरी तो पावडर होता. तो पावडर मयुरीनं सेवन केला. यामुळं तिच्या अंगात विष भिनले. ही बाब लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत विष तिच्या शरीरात भिनलं होतं. त्यामुळं शेवटी मयुरीचा मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.