AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहकारमध्ये खूप राजकारण, भुजबळांनी ते भोगलं; पंकजा यांचे नाशिकमध्ये प्रतिपादन

आमच्याकडे सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं, पण राजकारण बाजूला ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं, असा दावा भाजप नेत्या पकंजा मुंडे यांनी केला.

सहकारमध्ये खूप राजकारण, भुजबळांनी ते भोगलं; पंकजा यांचे नाशिकमध्ये प्रतिपादन
पंकजा मुंडे, भाजप नेत्या.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Nov 01, 2021 | 5:13 PM
Share

नाशिकः आमच्याकडे सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं, पण राजकारण बाजूला ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं, असा दावा भाजप नेत्या पकंजा मुंडे यांनी केला. त्या नाशिकमध्ये नामको बँकेच्या लोकार्पण सोहळ्यात सोमवारी बोलत होत्या.

पंकजा म्हणाल्या की, भुजबळ हे माझ्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक आहेत. माझा आणि भुजबळांचा कार्यक्रम घड्याळाच्या काट्यावर सुरू होतो. प्रमोद महाजन आणि मुंडे यांच्यामुळे मी 35 ते 40 मिनिटांचे भाषण करू शकते. खरे तर बँका कशा यशस्वी होतात याबाबत आश्चर्य वाटतं. आमच्याकडे पाणी प्यायलाचं असतं. यंदा या पाण्यानं मोठं नुकसान केलं. सहकारमध्ये खूप राजकारण आहे. भुजबळांनी ते भोगलं. पण राजकारण बाजूला ठेवलं, तर सहकार यशस्वी होतं. माझा कारखाना कर्जबाजारी आहे. बँक चालवणं अवघडय. आम्हाला हो म्हणायची सवय. बँकेत नो म्हणावं लागतं. नोटाबंदी झाली तेव्हा बँकांची काय परिस्थिती होईल असं वाटत होतं, पण 2 वर्षांनी सगळं स्थिर स्थावर झालं. यासाठी त्यांनी लोकांना सॅल्यूट केला. भुजबळ साहेब आपण अशा वर्गातून येतो जिथे संघर्ष केल्याशिवाय, खेचून घेतल्याशिवाय काही मिळत नाही असा उल्लेखही त्यांनी एकेठिकाणी केला.

आता नवीन राणे, नवीन भुजबळ

भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत एकत्र येत नाशिकमध्ये सोमवारी दुसरा कार्यक्रम केला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, अनिल देशमुख यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. ते वेगवेगळ्या न्यायालयात गेले, पण आता आपली बाजू मांडण्यासाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. नवाब मलिकांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात आरोपांची राळ उडवून दिली आहे. यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, नवाब मलिक जे बोलतात त्याविषयी त्यांच्याकडे कागदपत्रे असतात. मात्र, ते काय बोलले माहित नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दलसुद्धा चार प्रेमाचे शब्द व्यक्त केले. ते म्हणाले, मी ओबीसी बांधव, भगिनींसासाठी फार बोलतो. त्यांच्या आरक्षणीवर गंडातर आले त्यासाठी बोलतो. माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही. राणे यांनी प्रेम दाखविले त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. आता नवीन राणे, नवीन भुजबळ आहेत. जुने सोडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

सीटी स्कॅन नोंदीत झोल करून हॉस्पिटलला 17 लाखांचा गंडा; दोन कर्मचारी नाशिकमधून रफूचक्कर

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदार संघातल्या अनुदान वाटप घोळप्रकरणी अखेर दोषींवर होणार कारवाई

Follow Us
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा