Bhujbal|सर्वोच्च नेत्यांना महापालिका निवडणूक एकत्र लढवायचीय, पण…भुजबळ नेमकं काय म्हणतायत?

| Updated on: Jan 11, 2022 | 11:59 AM

उत्तरप्रदेश, गोवा निवडणुकीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, काही गोदी मीडियातील लोक सांगतात, किती मते वगैरे मिळतील. मात्र, आमच्या मतदार संघात किती मतं मिळतील, हे सांगणे सुद्धा कठीण असते.

Bhujbal|सर्वोच्च नेत्यांना महापालिका निवडणूक एकत्र लढवायचीय, पण...भुजबळ नेमकं काय म्हणतायत?
Chhagan Bhujbal
Follow us on

नाशिकः महापालिका निवडणुकीच्या आघाडीसाठी दरवाजे उघडे आहेत. शक्यतो महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांचे मत एकत्र निवडणूक लढवण्याचे आहे, पण काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. त्यामुळे आमची सर्व आघाड्यावर तयारी आहे, अशी माहिती मंगळवारी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक येथे बोलताना दिली.

एकनाथ शिंदेंनी विचारले…

छगन भुजबळ म्हणाले की, शक्यतो महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक एकत्र लढवायची आहे. मात्र, काही पक्ष सातत्याने स्वबळाची भाषा करत आहेत. आम्ही स्थानिक नेत्यांना बैठक घेऊन तयारी करण्याच्या सूचना केल्यात. सगळे मतदार संघ लढवण्याच्या दृष्टीने आपली तयारी पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीचे जे पक्ष सन्मानाने आमच्या सोबत बसतील आणि चर्चा करतील त्यांच्याशी चर्चा करून कोणासोबत जायचे ते बघू. आम्ही आमचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील एकत्र लढण्याबाबत विचारणा केली. आम्ही आमची तयारी असल्याचे सांगितले. सगळीकडे तयारी करून गरजेचं असल्याचं ते म्हणाले. कुणाला वाटत असेल स्वबळावर जावं, तर तो त्यांचा प्रश्न. नाही झालं तर निवडणुकीनंतर एकत्र येता येईल, असे सुतोवाचही त्यांनी केले.

त्यांच्या अनुभवाला किंमत

भुजबळ यांनी यावेळी गोपीचंद पडळकरांवर शरसंधान साधले. ते म्हणाले, पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही. ज्यांच्या मताला आणि अनुभवला किंमत आहे, असे फक्त शरद पवार आहेत. प्रश्न सुटत नसतील, तर मविआची प्रश्न सोडवण्याची सामूहिक जवाबदारी आहे. पवार साहेब राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांना लोकांच्या संबंधात काळजी वाटण स्वाभाविक आहे. गिरणी कामगारांचा संप अजून संपला असं कोणी जाहीर केलेला नाही. त्यामुळे मिलमधील लोक देशोधडीला लागले. एसटी संपाबाबत एवढा अट्टाहास करणं योग्य नाही. कामगारांना समजावून सांगणे हे पवार साहेबांचे काम असल्याचे ते म्हणाले.

मतदार संघाचे सांगणे अवघड

भुजबळांनी गिरीश महाजनांच्या प्रश्नाला बगल दिली. उत्तरप्रदेश, गोवा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले की, काही गोदी मीडियातील लोक सांगतात, किती मते वगैरे मिळतील. मात्र, आमच्या मतदार संघात किती मतं मिळतील, हे सांगणे सुद्धा कठीण असते. शेतकरी आंदोलन, बेकारी, महागाई असे मुद्दे असताना भाजपला यश मिळेल असे वाटत नाही. लोकांना देव, धर्म पाहिजे असतो. मात्र, रोजी-रोटी देखील महत्वाची असल्याचे ते म्हणाले.

इतर बातम्याः

नाशिक महापालिका निवडणुकीत सन्मानपूर्वक आघाडी, भुजबळांचे संकेत, शिवसेना अन् काँग्रेस राजी होणार का?

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत