सोमय्यांना पोलिसांची नोटीस, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन भेटावे, भुजबळांनी काय फोडला बॉम्बगोळा?

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. आरोप झाले, तर प्रत्यारोप होणार. यंत्रणा काम करतील. सरकार पडण्याचे काम कोणी करू नये. प्रत्येकाने संयमाने भाषा वापरावी.

सोमय्यांना पोलिसांची नोटीस, मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन भेटावे, भुजबळांनी काय फोडला बॉम्बगोळा?
छगन भुजबळ, किरीट सोमय्या.
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 12:40 PM

नाशिकः शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनासमोर (Shiv Sena Bhavan)पत्रकार परिषद घेऊन एकच राळ उडवून दिलीय. त्यानंतर राज्यातील मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हवा गरम झालीय. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला किरीट सोमय्या, नारायण राणे, चंद्रकात पाटलांसह इतर नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आता या राजकीय आखाड्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उतरले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिलीय. शिवाय सध्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. या सदर्भात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान, राष्ट्रपती यांची भेट घेतली पाहिजे, अशी मागणी केलीय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता या वादात उडी घेतल्याने राजकीय आरोप-प्रत्यालारोपाला पुन्हा रंग चढणार आहे.

काय म्हणाले भुजबळ?

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षाचे सरकार ज्या – ज्या राज्यात आहे, तिथे – तिथे जणू धरून मारतात अशी स्थिती आहे. त्यामुळे तिथल्या- तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाऊन भेट घेतली पाहिजे. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते कोणाला अभिप्रेत नाही. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे कळते. मात्र, सरकारी पक्षाच्या लोकांवर कारवाई करून ईडी आणि इतर चौकशी लावतात ते योग्य नाही. सरकारी यंत्रणांनी कोणत्याही दबावाखाली येऊन काम करू नये. भाजपमधील नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी केलाय.

काय दिला इशारा?

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नये. आरोप झाले, तर प्रत्यारोप होणार. यंत्रणा काम करतील. तुम्हालामध्ये जायचे, प्रसिद्धीसाठी काही काम करायचे याची गरज नाही. सरकार पडण्याचे काम कोणी करू नये. प्रत्येकाने संयमाने भाषा वापरावी. राग आणि ताप वाढला की, अनावर होतो आणि यातून अशी भाषा पुढे येते. मी या सर्व त्रासातून गेलो आहे. आधी लोकांना खरे वाटले. मात्र , न्यायालयाने केस डिस्चार्ज केली आहे. आमची लढाई आज ही सुरू आहे.

सोमय्यांना कशाची नोटीस?

भुजबळ म्हणाले की, काही लोकांना त्रास दिला जातोय. प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांचा काय संबंध आहे, माहिती नाही. आम्ही कोणाला तक्रार केली नाही. मात्र, पोलिसांची नोटीस प्राप्त झालीय. कोविड काळात गर्दी जमवू नये, नियमांचा भंग झाला म्हणून नोटीस बजावली आहे. किरीट सोमय्या या सारख्या मोठ्या नेत्यांची काळजी पोलीस आणि सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा असे करू नये म्हणून ही नोटीस बजावल्याचे उत्तरही त्यांनी दिले.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.