
राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर आता जनतेला निकालाचे वेध लागले आहेत. 21 डिंसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यातील रखडलेल्या महानगर पालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सर्वच पक्षांनी आता तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता शिवसेनेने काँग्रेसला सर्वात मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरचा माजी महापौर फोडला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सईताई खराडे, त्यांचे पती व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजित खराडे तसेच सुपुत्र शिवतेज खराडे यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्याचबरोबर कोल्हापूरचे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत अडगुळे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
📍 ठाणे |#कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सईताई खराडे, त्यांचे पती व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अजित खराडे तसेच सुपुत्र शिवतेज खराडे यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यासोबतच कोल्हापूरचे माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत अडगुळे यांनी देखील… pic.twitter.com/sVopt4YJDp
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 7, 2025
पालघरमध्येही शिवसेनेची ताकद वाढली आहे. शिवसेनेने आपल्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात पक्षाने लिहिले की, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर जिल्ह्यातील वसई – विरार येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष विशाल पाटील तसेच माजी नगरसेवक भूषण पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी अमोल पाटील, विशाल पाटील आणि तुषार पाटील यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार आणि शिवसेना पालघर संपर्कप्रमुख रवींद्र फाटक उपस्थित होते.