
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. त्यामुळे पक्षांतरालाही जोर आला आहे. अनेक नेते आपापल्या सोयीनुसार दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईतील सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र त्यांच्यासमोर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे मोठे आव्हान असणार आहे. कारण शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे मुंबईची जनता कुणाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी मोठा धक्का बसला आहे. दोन महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सांताक्रूझ विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक सुभाष सावंत, उबाठा गटाचे उपविभागप्रमुख नंदकुमार जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका वैशाली मराठे यांनीही आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ऍड.राजन साळुंखे यांच्यासह मुंबईतील 200 वकिलांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.समाधान सुलाणे, विक्रोळी कोर्ट बार असोसिएशनचे सभासद आणि पदाधिकारी, मुलुंड वकील संघटनेचे पदाधिकारी, कुर्ला वकील संघटनेचे पदाधिकारी यांचा समावेश होता. तसेच वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संस्थेचे नंदकुमार मोघे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
📍 ठाणे |#मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सांताक्रूझ विभागातील उबाठा गटाचे माजी नगरसेवक सुभाष सावंत, तसेच उबाठा गटाचे उपविभागप्रमुख नंदकुमार जाधव, #पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेविका वैशाली मराठे यांनी काल आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या साथीने शिवसेनेचे मुख्य नेते व… pic.twitter.com/zO2CNrROfv
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) December 21, 2025
धनगर समाजाचे नेते यशवंत सेनेचे प्रमुख माधवराव गडदे यांनीही आपल्या 200 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याशिवाय मनसेचे उप विभाग अध्यक्ष प्रीतम चेऊलकर, शाखा अध्यक्ष सुनेत्रा चव्हाण, अरुणा महागरे आणि त्यांच्यासह मुंबई आणि उपनगरातील 70 ते 80 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाची ताकद वाढली आहे. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील तसेच मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.