ज्याची शक्यता नव्हती तेच घडलं… प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, दोन जणांचा जय महाराष्ट्र

BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. दोन माजी नगर सेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ज्याची शक्यता नव्हती तेच घडलं... प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, दोन जणांचा जय महाराष्ट्र
Uddhav Thackeray Sad
Image Credit source: Google
| Updated on: Jan 13, 2026 | 7:11 PM

मुंबईसह राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचार केला. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील सर्वच बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा समावेश होता. या निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिलालं. आता निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेना मोठा दणका दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे गोरेगाव विभागातील माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका प्रमिला दिलीप शिंदे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेची ताकद वाढली

एकनाथ शिंदे यांनी दिलीप शिंदे आणि प्रमिला शिंदे यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. आता आगामी निवडणुकीत पक्षाला याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंसमोर सत्ता राखण्याचे आवाहन

राज्यातील मुंबई महानगर पालिकांच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरेंसमोर मुंबईची सत्ता राखण्याचे आवाहन असणार आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केलेली आहे. तर भाजप, शिवसेना आणि आरपीआय आठवले गट या पक्षांची युती आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली आहे. आता 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर कोणत्या पक्षाच्या गळ्यात महापौरपदाची माळ टाकतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.