AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता अजितदादांच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आता काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, बडा नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे.

राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता अजितदादांच्या गळाला, पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
ajit pawar
| Updated on: Jun 05, 2025 | 8:14 AM
Share

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली, तब्बल 232 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. विधानसभेत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते महायुतीमध्ये प्रवेश करत असल्याचं चित्र आहे, महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत.

दरम्यान आता काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा नेता आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. येत्या 12 जूनला सानंदा हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अखेरची घरघर लागली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये या जिल्ह्यातून काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान आता काँग्रसला बुलढाणा जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे,  खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, ते लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश कणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार सानंदा हे येत्या 12 जूनला आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.  सानंदा यांनी आपल्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. ते आता येत्या 12 जूनला खामगावमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सानंदा यांनी सलग 15 वर्ष  आमदार म्हणून खामगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनित्व केलं आहे, मात्र त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, ते आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...