AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! गेम फिरला, चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंना तीन जबर धक्के, घडामोडींना वेग

मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिवसेना शिंदे गटात अनेक नेत्यांचे पक्ष प्रवेश होत आहेत. मात्र दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांनाच मोठा धक्का बसला असून, घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! गेम फिरला, चार दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंना तीन जबर धक्के, घडामोडींना वेग
eknath shinde
| Updated on: Aug 03, 2025 | 5:08 PM
Share

सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे, चार दिवसांपूर्वी शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला, त्यानंतर  शिवसेना शिंदे गटाच्या सोलापुरातील 11 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, शिवसेना जिल्हा समन्वयक आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पुढाकार घेत 11 जणांचे राजीनामे पक्षाकडे दिले होते, दरम्यान त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला सोलापुरात आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेतील 21 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. शिवसेना  संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ या युवा सेनेच्या  पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.

पक्षाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांना डावलून, पक्षात पदे दिली जात आहेत. महेश साठे यांनी संपर्कप्रमुख यांना डावलून पदे दिली आहेत. लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे हे पक्षातील वरिष्ठांची मोठी दिशाभूल करत आहेत, त्यामुळे आम्ही पदाचा राजीनामा देत असल्याचं  या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

काय आहे नेमका आरोप? 

लोकसभा संपर्क प्रमुख संजय साठे यांच्याविरोधात सोलापूर शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.   संजय साठे यांनी शिवाजी सावंतांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्याची या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे, मात्र या तक्राराची अद्यापही एकनाथ शिंदे यांनी दखल न घेतल्यानं हे पदाधिकारी नाराज आहेत. चार दिवसांपूर्वी शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आणखी आकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज युवासेनेच्या तब्बल 21 जणांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सोलापुरात एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे, मात्र दुसरीकडे शिंदे हे राज्यात उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के देत आहे. आज मुंबईमध्ये आणखी एका माजी नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आतापर्यंत तब्बल 124 माजी नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?